नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा तलावात येणार पाणी

नरोटेवाडीतील कालव्यातून  हिप्परगा तलावात येणार पाणी
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा तलावात येणार पाणी

सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून सोडलेले पाणी नान्नजच्या माळरानावरून नरोटेवाडी, मार्डीमार्गे हिप्परगा तलावात सोडण्यासाठी चर खोदण्याच्या कामाला शनिवारी (ता. १४) शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून हिप्परगा तलावात पाणी आणण्याची कार्यवाही सुरू आहे.  हिप्परगा तलावालगतच्या ४६ गावांचा प्रश्‍न आता या कामाच्या माध्यमातून सुटणार आहे. उजनी धरणातून कालव्याद्वारे सोडलेले पाणी उत्तर सोलापुरातील नरोटेवाडीत पोचले. मात्र, तेथून केवळ एक किलोमीटर अंतरावरील हिप्परगा तलावात पाणी सोडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. उजनीचे वाया जाणारे पाणी हिप्परगा तलावात सोडल्यास सोलापूरसह अन्य दोन तालुक्‍यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असा विश्‍वास गणेश वानकर यांनी या वेळी व्यक्‍त केला. काही दिवसांपूर्वी आपण त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेने एक किलोमीटर चर खोदण्यासाठी यंत्रसामग्रीही उपलब्ध केली असून त्याचे काम सुरू झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हिरप्परगा तलावात येणाऱ्या पाण्यामुळे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापुरातील शेतीचा अन्‌ सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्‍वास प्रा. शिवाजी सावंत यांनी व्यक्‍त केला. याप्रसंगी नगरसेवक मनोज शेजवाल, चरणराज चवरे, नरोटेवाडीच्या सरपंच राधा गाडेकर, मनोज गुंड, सिध्दाराम चाकोते, वामन शिंदे, अविनाश पाटील, दाजी धुमाळ, नागनाथ शिंदे, राजू धुमाळ, किरण जाधव, सुमित उंबरे, विनोद भिंगारे, बाळासाहेब पाटील, प्रमोद गवळी, दादा पवार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com