Agriculture news in marathi; From the canal in Narotewadi The water will come to Hipparga Lake | Agrowon

नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा तलावात येणार पाणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून सोडलेले पाणी नान्नजच्या माळरानावरून नरोटेवाडी, मार्डीमार्गे हिप्परगा तलावात सोडण्यासाठी चर खोदण्याच्या कामाला शनिवारी (ता. १४) शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून हिप्परगा तलावात पाणी आणण्याची कार्यवाही सुरू आहे. 

सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून सोडलेले पाणी नान्नजच्या माळरानावरून नरोटेवाडी, मार्डीमार्गे हिप्परगा तलावात सोडण्यासाठी चर खोदण्याच्या कामाला शनिवारी (ता. १४) शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून हिप्परगा तलावात पाणी आणण्याची कार्यवाही सुरू आहे. 

हिप्परगा तलावालगतच्या ४६ गावांचा प्रश्‍न आता या कामाच्या माध्यमातून सुटणार आहे. उजनी धरणातून कालव्याद्वारे सोडलेले पाणी उत्तर सोलापुरातील नरोटेवाडीत पोचले. मात्र, तेथून केवळ एक किलोमीटर अंतरावरील हिप्परगा तलावात पाणी सोडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. उजनीचे वाया जाणारे पाणी हिप्परगा तलावात सोडल्यास सोलापूरसह अन्य दोन तालुक्‍यांना त्याचा फायदा होऊ शकतो, असा विश्‍वास गणेश वानकर यांनी या वेळी व्यक्‍त केला. काही दिवसांपूर्वी आपण त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेने एक किलोमीटर चर खोदण्यासाठी यंत्रसामग्रीही उपलब्ध केली असून त्याचे काम सुरू झाले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हिरप्परगा तलावात येणाऱ्या पाण्यामुळे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापुरातील शेतीचा अन्‌ सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्‍वास प्रा. शिवाजी सावंत यांनी व्यक्‍त केला. याप्रसंगी नगरसेवक मनोज शेजवाल, चरणराज चवरे, नरोटेवाडीच्या सरपंच राधा गाडेकर, मनोज गुंड, सिध्दाराम चाकोते, वामन शिंदे, अविनाश पाटील, दाजी धुमाळ, नागनाथ शिंदे, राजू धुमाळ, किरण जाधव, सुमित उंबरे, विनोद भिंगारे, बाळासाहेब पाटील, प्रमोद गवळी, दादा पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स

इतर बातम्या
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...