Agriculture news in marathi The canal overflows at Mhaisal | Agrowon

‘म्हैसाळ’चा कालवा ओव्हरफ्लो

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

बेडग (ता. मिरज) येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालवा पंप हाऊस टप्पा क्रमांक ३ मधील मोटारीत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कालवा ओव्हरफ्लो झाला होता.

आरग, सांगली : बेडग (ता. मिरज) येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालवा पंप हाऊस टप्पा क्रमांक ३ मधील मोटारीत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कालवा ओव्हरफ्लो झाला होता. कालव्याचे पाणी परिसरातील शेतात घुसल्याने शेती पिकांसह बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभाग कानाडोळा करताना दिसून येत आहे.

मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी भरून सुद्धा लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी योजनेच्या पाणी पट्टीत वाढ करण्यात आली आहे. यंदा २४ तासाला नऊ हजार रुपये इतका जादा दर आकारला जात आहे. जादा पैसे भरूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. 

पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे कालवा ओव्हरफ्लो होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. वाहत्या पाण्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. पिकांत गुडघाभर पाणी उभे राहिले आहे.

आंदोलनाचा इशारा
दरवर्षी कालवा ओव्हरफ्लो होतो. शेती पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रार करूनही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नुकसानग्रस्तांनी दिला आहे.

प्रतिक्रिया
दरवर्षीच म्हैसाळचा मुख्य कालवा ओव्हरफ्लो होतो. शेतातील माती पाण्याबरोबर वाहून जाते. पिकांचे नुकसान होते. त्याकडे पाटबंधारे विभागाने कायम दुर्लक्ष केले. पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी.
- अण्णासाहेब पाटील, शेतकरी

प्रतिक्रिया

म्हैसाळ कालवा टप्पा क्र. ३ ओव्हरफ्लो झाला की शेजारील ओढ्यातून कालव्याचे पाणी वाहते. सध्या ५२ मोटारी सुरू आहेत. पंप हाऊसमधील मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्याने कालवा ओव्हरफ्लो झाला होता.
- जयराम वाखार्डे,
उपअभियंता, पाटबंधारे विभाग
 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...