निरा-भाटघरच्या कालवा दुरुस्तीसाठी रास्ता-रोको 

पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील निरा भाटघरच्या कालव्यात (पानतास नळी ते हरिजन फाटा व जगताप फाटा) मोठ्या प्रमाणात झाडे उगवली आहेत.
निरा-भाटघरच्या कालवा दुरुस्तीसाठी  युवक काँग्रेसचा पंढरपुरात रास्ता-रोको For canal repair of Nira-Bhatghar Rasta-Roko of Youth Congress in Pandharpur
निरा-भाटघरच्या कालवा दुरुस्तीसाठी  युवक काँग्रेसचा पंढरपुरात रास्ता-रोको For canal repair of Nira-Bhatghar Rasta-Roko of Youth Congress in Pandharpur

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील निरा भाटघरच्या कालव्यात (पानतास नळी ते हरिजन फाटा व जगताप फाटा) मोठ्या प्रमाणात झाडे उगवली आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे कालवा खराब झाल्यामुळे उन्हाळी हंगामातील पाण्याची पाळी शेतकऱ्यास मिळण्यास अडचणीचे झाले आहे. या बाबत पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर- मंगळवेढा महामार्गावर रास्ता-रोको आंदोलन केले. 

युवक कॉँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले, माजी सरपंच सुनील वाघमारे, किरण घोडके, गोरख ताड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. निरा भाटघर पंढरपूर विभागाचे उपअभियंता यांना निवेदन देऊन ही मागणी केली होती. तसेच निवेदनाची दखल न घेतल्यास अनवली चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता. त्यानंतरही दखल घेतली नसल्याने मंगळवारी (ता. २) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.

युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनास सुरूवात केल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबचलांब रांगा लागलेल्या पाहावयास मिळाले. या वेळी सिद्धनाथ भोसले, सुनील वाघमारे, गजेंद्र शिंदे, संजय माळी, दिगंबर भोसले, संजय पाटील, आप्पा पाटील, युवक कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे, तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, शहर कार्याध्यक्ष सागर कदम, संदीप मुटकुळे उपस्थित होते.    कामास तत्काळ सुरुवात  आंदोलनाची दखल घेत तत्काळ निरा भाटघर पंढरपूर विभागाचे उपअभियंता नागराज ताटी थेट आंदोलनस्थळी आले. आंदोलकांच्या मागण्या लक्षात घेऊन त्या बाबत त्यांना लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच आजच्या आजच या कामाची सुरुवात करणार असल्याचे आश्वासनही दिले. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com