agriculture news in marathi cancel Pandharpur Karthik vari : District Administration and police appeal government | Agrowon

पंढरपूरची कार्तिकी वारी यंदा नको; जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांचा प्रस्ताव   

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रतिकात्मक वारी साजरी करावी, किंबहुना वारीच भरवू नये, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. 

सोलापूर : पंढरपूरची कार्तिकी वारी येत्या २६ नोव्हेंबरला होणार आहे. त्यातच मंदिर खुले करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे वारीसाठी होणारी वारकऱ्यांची लाखोंची गर्दी लक्षात घेता कोरोनाचा धोका वाढू शकतो, प्रसंगी आरोग्य यंत्रणा अपुरी पडू शकते. त्यामुळे यंदा प्रतिकात्मक वारी साजरी करावी, किंबहुना वारीच भरवू नये, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. 

मंदिरे सुरु केल्यानंतर आता भाविकांचा दर्शनासाठी ओघ वाढतो आहे. सध्या पंढरपुरात रोज दोन हजार भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. परंतु आठ महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने आणि वारी आता तोंडावर असल्याने भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या वारीमध्ये ज्येष्ठ मंडळींचा सहभाग अधिक असतो. त्यामुळे गर्दी वाढली तर दर्शनरांग, वाळवंट वा मठात सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे आणि किती होईल, याची शंका आहे. 

दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवल्यास सध्याची पाचकिलोमीटरची दर्शन रांग २५ किलोमीटरपर्यंत पोचेल. पण पंढरपुरातील दरवर्षीच्या गर्दीचा विचार करता, हे कितपत शक्य आहे. शिवाय ६५ एकर परिसरातही वारकऱ्यांना राहता येणार नाही, असे या प्रस्तावात म्हटले आहे. हा प्रस्ताव आधी विधी व न्याय खात्याकडे पाठवून नंतर तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. आता ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे. 

‘गावातच प्रतिकात्मक वारी साजरी व्हावी’ 
कोरोनास्थितीच्या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वारीला गर्दी करण्याऐवजी वारकऱ्यांनी टप्प्या-टप्प्याने दर्शनासाठी यावे, स्वतःच्या घरी अथवा गावातच प्रतिकात्मक वारी साजरी करावी, असे आवाहन केले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...