ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
ताज्या घडामोडी
तोलाई परिपत्रक होणार रद्द
पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर होणारी तोलाई आकारण्यात येऊ नये, याबाबतच्या पणन संचालकांच्या २०१४ च्या परिपत्रकाला कायद्याचा आधार नसल्याने ते रद्द करण्यात यावे, ही सुनील पवार समितीने केलेली शिफारस मान्य करत शासन परिपत्रक रद्द करणार आहे. तर, तोलाईबाबतच्या कायद्याच्या बदलासाठी समिती स्थापन करण्याच्या हालचाली मंत्रालय पातळीवर सुरू असून, हा निर्णय संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावरील तोलाई रद्द करण्याच्या विरोधात ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पुणे बाजार समितीच्या कार्यालयाबाहेर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला गुरुवारी (ता. १९) शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी उपस्थिती लावली.
तोलाईबाबत राज्य शासनाने पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालाच्या शिफारसी तातडीने मंजूर कराव्यात यासाठी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाची दखल घेत, राज्य शासनाने समितीने केलेली पणन संचालकांच्या २०१४ च्या परिपत्रकाला कायद्याचा आधार नसल्याने रद्द करण्यात यावे, ही शिफारस रद्द करण्याचे आश्वासन डॉ. आढाव यांना दिले असल्याची माहिती आहे. हे परिपत्रक रद्द करून, तोलाईबाबतच्या कायदा बदलासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे समजते.
- 1 of 1026
- ››