शेतकऱ्यांचा गळफास ठरणारे कायदे रद्द करा : अमर हबीब

शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण कमाल जमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे आहेत.
amar habib
amar habib

हिंगोली ः शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण कमाल जमीन धारणा कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा गळफास ठरणारे हे नरभक्षी कायदे रद्द करावेत, अशी मागणी किसान पुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केले. 

चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे कुटुंबीयांच्या सामूहिक आत्महत्येच्या 35 व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी औंढा नागनाथ ते चिलगव्हाण पदयात्रेची सुरुवात गुरुवारी (ता. 11) झाली. या वेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. राजीव बरसगेकर, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते ब. ल. तामसकर, अनंतराव देशपांडे, रामकिशन रुद्राक्ष, सुभाष कच्छवे, माउली म्हात्रे, उद्धवराव आहेर, डॉ. शिवशंकर शिंदे, संदीप म्हात्रे, माऊली म्हात्रे आदी उपस्थित होते. 

अमर हबीब पुढे म्हणाले, की शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती असून, त्याकडे ना सत्ताधाऱ्यांचे ना विरोधी पक्षांचे लक्ष आहे. आजवरच्या अर्थसंकल्पाचा उपयोग झालेला नाही. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे आवश्यक आहे. शेतकरी आत्महत्यांकडे समाज तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच 19 मार्च रोजी महाराष्ट्रातच नव्हे, तर देश, विदेशातील असंख्य व्यक्ती एक दिवसाचा उपवास करतात. शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी सर्वांनी उपवास करावा, हा निरोप देण्यासाठी देखील ही पदयात्रा काढण्यात आली आहे. ही पदयात्रा कोणत्या पक्षाची किंवा संघटनेची नाही. 

पदयात्रेचा मार्ग...  गुरुवारी (ता.11) औंढा नागनाथ येथे साकडे- येहळेगाव- डिग्रस (कऱ्हाळे), शुक्रवार (ता.12)ः हिंगोली- खानापूर चिता, शनिवार (ता. 13 ) ः कळमनुरी- माळेगाव, रविवार (ता. 14) बाभळी- शेंबाळपिंपरी, सोमवार (ता.15) ः मुळावा- पळशी, मंगळवार (ता. 16), कृषी महाविद्यालय, मरसूळ- उमरखेड- सुकळी, बुधवार (ता.17) ः नांदगव्हाण- बिजोरा, गुरुवार (ता.18) ः मुडाणा- महागाव, शुक्रवार (ता.19) ः चिलगव्हाण (उपवास आणि श्रद्धांजली).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com