दहा मतदारसंघांत १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई   : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील दहा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या २७८ पैकी ९९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती २७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होतो. या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीत २७८ पैकी ९९ उमेदवारांनी माघार घेतली. मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणात बुलडाणा लोकसभा मतदारसंघात १२, अकोला ११, अमरावती २४, हिंगोली २८, नांदेड १४, परभणी १७, बीड ३६, उस्मानाबाद १४, लातूर १० आणि सोलापूर मतदारसंघातून १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला मतदान होणार आहे. 

तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जप्रक्रिया सुरू  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांत गुरुवारपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. शुक्रवारी सहा मतदारसंघांत ११, तर शुक्रवारीअखेर ९ मतदारसंघात २० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय शुक्रवारी दाखल आणि कंसात आतापर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या अशी आहे. जळगाव मतदारसंघात १ (२ उमेदवार), औरंगाबाद ३ (४), रायगड २ (४), सातारा १ (१), कोल्हापूर २ (२) आणि हातकणंगले मतदारसंघात २ उमेदवारांनी, तर आतापर्यंत ४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 

तीन मतदारसंघांत शुक्रवारी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही, मात्र शुक्रवारीअखेर ३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामध्ये रावेर, जालना आणि सांगली मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. पुणे, बारामती, नगर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांत शुक्रवारअखेर एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com