agriculture news in Marathi cane chopping labor less than last year Maharashtra | Agrowon

ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन लाखांनी घटली

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

दुष्काळी भागात चांगला पाऊस झाल्याने, तसेच कोरोनाची धास्ती आणि मजुरीत अल्प दरवाढ मिळाल्यानेही मजूर कमी झाल्याचे जाणकार सांगत आहेत. 

नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांची संख्या यंदा सुमारे पंधरा टक्क्यांनी घटली आहे. दुष्काळी भागात चांगला पाऊस झाल्याने, तसेच कोरोनाची धास्ती आणि मजुरीत अल्प दरवाढ मिळाल्यानेही मजूर कमी झाल्याचे जाणकार सांगत आहेत. कष्टाच्या तुलनेत मोबदला मिळत नसल्याने अनेक तरुणांनी इतर माध्यमांतून रोजगार शोधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. 

राज्यातील दोनशेहून अधिक साखर कारखान्यांवर राज्यभरातील सुमारे १२ ते १३ लाख ऊसतोड मजूर काम करतात. त्यात सर्वाधिक सहा ते सात लाख मजूर बीड जिल्ह्यातील असून, त्या पाठोपाठ नगर जिल्ह्यातील पूर्व भाग, जालना, परभणी, उस्‍मानाबाद, जळगाव, चाळीसगाव, नंदुरबार, धुळे आदी भागांतून मजूर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. ज्या भागातून मजूर स्थलांतरित होतात, तो सिंचनाचा अभाव व सातत्याने दुष्काळ असलेला भाग आहे.

गेल्या अनेक वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच दुष्काळी आणि ऊसतोड मजुरांच्या भागात चांगला पाऊस झाला आहे. ९५ टक्के ऊसतोड मजूर शेतकरी आहेत. यंदा पाणी उपलब्ध झाल्याने दर वर्षी ऊस तोडणीला जाणाऱ्या अनेक मजुरांनी शेतीला प्राधान्य दिले आहे. 

तरुणांसोबत पन्नासी ओलांडलेली वयस्क व्यक्तीही ऊस तोडणीचे काम करतात. यंदा कोरोनाचे सावट आहे. कारखाना कार्यस्थळावर कोरोनाबाबत कोणताही काळजी सरकार अथवा कारखानदार घेत नाहीत. मजुरांचा विमा उतरवला नाही. त्यामुळे बाधा झालीच तर आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागण्याच्या भीतीनेही अनेक वयस्क मजूर कारखान्यांवर गेले नाहीत. 

चौदा टक्के दरवाढ 
यंदा दोन महिने संप करून मजुरी दरात १४ टक्के दरवाढ झाली. महागाईचा विचार करता ऊसतोडणीतून मिळणारी रक्कम अल्प असल्याने ऊस तोडणीला जाणाऱ्या अनेक तरुणांनीही ऊसतोडणीऐवजी खासगी कंपनीत अथवा अन्य बाबीतून रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 

मजूरटंचाईच्या परिणामांची भीती 
नगरसह राज्यातील बहुतांश भागात दर वर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र तीस ते चाळीस टक्क्यांनी जास्त आहे. पुढील वर्षीही ऊस अधिक उपलब्ध होणार असल्याने अनेक कारखान्यांनी नव्याने ऊस लागवडीच्या नोंदी थांबविल्या आहेत. अशा परिस्थितीत ऊसतोड मजुरांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मजूरटंचाईला हार्वेस्टरचा पर्याय असला तरी मध्यंतरीच्या पावसाने अनेक भागात उसाचे पीक आडवे झाले आहे. त्याची तोड करण्यासाठी मजूरच हवे आहेत. यंदा साधारण सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ साखर कारखान्याचा गाळप हंगाम चालण्याची शक्यता असून, मजूरटंचाईचा परिणाम होण्याची ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांना चिंता आहे.

प्रतिक्रिया
राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या मजुरांची सरकार आणि कारखान्यांनी दखल घेतली नाही. या वर्षी केवळ १४ टक्के दरवाढ मिळाली ती अत्यंत तोकडी आहे. अशीच परिस्थितीत राहिली तर भविष्यात मजुरांची संख्या घटतच राहील. 
- प्रा. सुशीला मोराळे, नेत्या, ऊसतोडणी कामगार संघटना, बीड


इतर अॅग्रो विशेष
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...