Agriculture news in Marathi Cane counting will be done by drone | Agrowon

‘ड्रोन’द्वारे करणार ऊस मोजणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

पाटबंधारे विभागाकडून मध्यम प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील ऊस क्षेत्राची मोजणी ‘ड्रोन’द्वारे करण्यात येणार आहे. यातून होणाऱ्या अचूक क्षेत्राच्या नोंदणीचा वापर पाणीपट्टी आकारणीसाठी करण्यात येणार असून, पाटबंधारेचा महसूलही वाढणार आहे.

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून मध्यम प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील ऊस क्षेत्राची मोजणी ‘ड्रोन’द्वारे करण्यात येणार आहे. यातून होणाऱ्या अचूक क्षेत्राच्या नोंदणीचा वापर पाणीपट्टी आकारणीसाठी करण्यात येणार असून, पाटबंधारेचा महसूलही वाढणार आहे.

पाणीपट्टी आकारणीसाठी पाटबंधारेकडून ऊस क्षेत्र नोंदीची कार्यवाही पारंपरिक पद्धतीने होते. या प्रक्रियेत चुकांसह उत्पादकांकडून मिळणाऱ्या अपुऱ्या माहितीमुळे अपेक्षित महसूल मिळत नाही. सध्या कर्मचाऱ्यांकडून कधी बांधावर जाऊन तर कधी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ऊस क्षेत्राची नोंदणी होते. अलीकडे काही वर्षांपासून पाटबंधारे विभागात मनुष्यबळाची वानवा आहे. यामुळे हे काम पूर्ण क्षमतेने होण्यात अडचणी आहेत. पाणीपट्टी वसूल होणाऱ्या क्षेत्रापेक्षा कितीतरी पटीने अधिक क्षेत्राला प्रकल्पाचे पाणी वापरले जाते; परंतु शासकीय मोजमापात लाभक्षेत्राबाहेरील असे क्षेत्र येतच नाही. यामुळे पाणीपट्टी आकारणीही होतच नाही. आता ऊस क्षेत्राची अचूक माहिती मिळवण्यासाठी पाटबंधारे विभाग जिल्ह्यात ड्रोनचा वापर करणार आहे. 

या मोजणीत लाभक्षेत्र आणि त्याबाहेरील ऊस क्षेत्राची मोजणी होईल. लाभक्षेत्राबाहेरील उसाची मोजणी करून तो ऊस विहीर, कूपनलिकेच्या पाण्यावर आहे की त्याला प्रकल्पाचे पाणी आहे, याची माहिती कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन घ्यावी लागेल. त्यासाठी विहिरीवर पाच अश्‍वशक्तीचा पंप असेल तर त्याद्वारे किती क्षेत्र भिजते, याचा अहवाल कृषी विभागाकडून घेऊन, त्यापेक्षा अधिक ऊस असेल तर त्याची पाणीपट्टी आकारली जाईल.

चित्री लाभक्षेत्रात होणार सर्व्हे
कोल्हापूर दक्षिण विभागात पाटगाव, चिकोत्रा, फाटकवाडी, चित्री, जंगमहट्टी, झांबरे असे मध्यम प्रकल्प आहेत. या विभागात प्रायोगिक तत्त्वावर पहिली ऊस क्षेत्राची मोजणी ही चित्री लाभक्षेत्रांतर्गत होणार आहे. चित्री लाभक्षेत्रात आजरा व गडहिंग्लजच्या एकूण ६७०० हेक्टर उसाची नोंद आहे; परंतु अलीकडे हे क्षेत्र वाढले असले तरी आकारणी मात्र जुन्याच क्षेत्रावर सुरू आहे.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...