agriculture news in Marathi cane crop affected by cyclone and flood Maharashtra | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला फटका 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या पश्चिम भागात उसाचे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरु आहे. 

कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या पश्चिम भागात उसाचे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह दिवसभर पाऊस सुरु असल्याने उभ्या उसाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी दिली. 

पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील उसाला जोरदार वाऱ्याचा मोठा फटका बसला. या भागात डोंगर उतारावरही उसाची लागवड केली जाते. सातत्याने जोरदार वारे वाहू लागल्याने मोठ्या आकाराचा ऊस आडवा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वाऱ्याबरोबरच पाऊस असल्याने ऊस पाण्यातच पडला असल्याचे चित्र पश्चिमेकडील तालुक्यात होते. सातत्याने पाऊस सुरु राहिल्याने ऊस कुजण्याची भिती ऊस उत्पादकांनी व्यक्त केली.  

जिल्ह्यात महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या शिवारामध्ये नदीचे पाणी वेगाने शिरत आहे. त्यामुळे उभ्या उसाला धोका निर्माण झाला आहे. हातकणंगले, शिरोळ, करवीर तालुक्यांमध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन दिवसांपासून नद्यांचे पाणी जलदगतीने वाढले. यामुळे शिवारे जलमय होत आहेत. ज्या ऊस शेतीमध्ये नद्यांचे पाणी शिरले तेथे तातडीचा धोका नसला तरी हे पाणी सात ते आठ दिवस साठून राहिल्यास उभ्या उसाला नुकसान पोहोचू शकते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. 


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...