agriculture news in Marathi cane crushing in country in last stage Maharashtra | Agrowon

देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात 

राजकुमार चौगुले
शुक्रवार, 19 मार्च 2021

देशात साखर उत्पादनाची विक्रमी घोडदौड मार्चच्या मध्यापर्यंत सुरुच आहे. १५ मार्च अखेर देशात २५८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर: देशात साखर उत्पादनाची विक्रमी घोडदौड मार्चच्या मध्यापर्यंत सुरुच आहे. १५ मार्च अखेर देशात २५८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ लाख टनांनी उत्पादन वाढले आहे. या कालावधीत देशातील ५०२ पैकी १७१ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. 

देशातील गळीत हंगाम सुरु होऊन साडेसहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरु असणारी साखर उत्पादनाची वाढ अंतिम टप्प्यातही कायम राहिली. सुरवातीच्या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ लाख टनांनी साखर उत्पादन वाढले होते. यात वाढ होत आता हे उत्पादन ४२ लाख टनांनी वाढले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशात झालेली साखर उत्पादन वाढ देशाचे उत्पादन वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे. 

कर्नाटकातील हंगाम देशात पहिल्यांदा आटोपला आहे. राज्यातील ६६ पैकी ६२ साखर कारखान्यांनी आपला हंगाम संपविला. मार्च मध्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे. या कालावधीत राज्यात ९४ लाख टनाचे साखर उत्पादन झाले आहे. ४८ कारखान्यांचा हंगाम संपला आहे महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात ८४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशातील गळीत हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. 

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत महाराष्ट्रात गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल ३९ लाख टनांनी साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. सोलापुरातील सर्वाधिक ३१ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. येत्या काही दिवसांत पुणे, सोलापूर, नगर, औरंगाबादमधील कारखाने जलद गतीने बंद होतील. कोल्हापूर विभागातील बहुतांशी कारखाने एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात बंद होण्याची शक्‍यता आहे. साखर उद्योगातील सूत्रांच्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात राज्याचे साखर उत्पादन १०० लाख टनांपेक्षा जास्त होवू शकते. 

८० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा 
यंदा ३२५ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट केंद्राने देशातील कारखान्यांना दिले आहे. ८ मार्च अखेर ८० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा कारखान्यांनी तेल कंपन्यांना केला आहे. पुरवठा केलेल्या इथेनॉलपैकी ७८ टक्के इथेनॉल हे उसाचा रस व बी-हेवी मोलॅसिस पासून तयार करण्यात आले आहे. 

देशाच्या हंगामाची स्थिती (१५ मार्च अखेर)
(उत्पादन लाख टन) 

राज्य साखर उत्पादन बंद कारखाने 
महाराष्ट्र ९४.०५ ४८ 
कर्नाटक ४१.३५ ६२ 
उत्तर प्रदेश ८४.२५ १८
गुजरात ८.४९ २ 

(आकडेवारी स्त्रोतः इस्मा) 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...