agriculture news in Marathi, cane crushing season start in country, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

देशात ऊस गाळप हंगामास प्रारंभ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर: देशातील नव्या गाळप हंगामास सुरवात झाली आहे. आजअखेर २८ कारखान्यांतून १४.५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.६७ टक्के उताऱ्याने १.२५ लाख टन नव्या साखरेचे उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर: देशातील नव्या गाळप हंगामास सुरवात झाली आहे. आजअखेर २८ कारखान्यांतून १४.५० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ८.६७ टक्के उताऱ्याने १.२५ लाख टन नव्या साखरेचे उत्पादन झाले आहे.

 यंदाच्या गाळप हंगामात उत्तर प्रदेश व कर्नाटक राज्यांनी आघाडी घेतली आहे. कर्नाटक राज्यातील ९ कारखान्यांनी ६.६७ लाख टन उसाचे गाळप केले असून, त्यातून सरासरी ९ टक्के उताऱ्याने ६० हजार टन नवे साखर उत्पादन केले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील १३ कारखान्यांतून १.८८ लाख टन ऊस गाळप झाले असून, त्यातून सरासरी ८ टक्के उताऱ्याने १५ हजार टन साखर उत्पादन झाले. दक्षिणेतील तमिळनाडू राज्यातील ६ कारखान्यांत ५.८८ लाख टन ऊस गाळप झाले असून, सरासरी ८.५० टक्के उताऱ्याने ५० हजार टन साखर उत्पादन तयार झाले.

वास्तविक १ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू झालेल्या नवीन साखर वर्षातील ऊस गाळपाची सुरवात महाराष्ट्रातून होणे अपेक्षित होते. मात्र, परतीच्या पावसाने प्रमुख ऊस उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जो तडाखा दिला आहे, त्यामुळे शेतातील ओलावा संपेपर्यंत ऊसतोड होऊ शकत नसल्याने महाराष्ट्राचा गाळप हंगाम नोव्हेंबरच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यापासून सुरू होण्याची चिन्हे आहेत. गुजरात, कर्नाटक व इतर राज्यांतील गाळप हंगामदेखील नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण जोमाने सुरू होईल, असा सध्याचा कयास आहे. 

‘‘एकूण उत्पादनाखालील क्षेत्रामध्ये झालेली घट व त्यासोबत ऊस उत्पादनामध्ये होणारी घट लक्षात घेता हंगामअखेर देशातील नवे साखर उत्पादन २६० ते २६५ लाख टन इतपत मर्यादित होईल, जे गतवर्षीच्या विक्रमी ३३१ लाख टन साखर उत्पादनापेक्षा सुमारे ७० लाख टनांनी कमी असण्याचा अंदाज आहे,’’ असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

दर संतुलित राहण्याची शक्यता
‘‘गेल्या दोन वर्षांच्या विक्रमी साखर उत्पादनानंतर यंदाच्या वर्षीचे अपेक्षित असणारे साखर उत्पादन, इथेनॉल निर्मितीच्या वाढीव क्षमतेमुळे तिकडे होणारा साखर वापर, तसेच विक्रमी ६० लाख टन होणारी साखर निर्यात यांच्या परिणामस्वरूप देशातील कारखानास्तरावरील साखर विक्रीच्या दरात संतुलन राहील, जेणेकरून साखर कारखान्यांच्या स्तरावरील आर्थिक परिस्थिती सुधारेल,’’ असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला.


इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...