agriculture news in Marathi cane crushing will be start on full form in November Maharashtra | Agrowon

गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची चिन्हे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम निर्धारित वेळेत म्हणजे १५ ऑक्टोबरला पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. अपवाद वगळता राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

गळीत हंगाम सुरू होण्यास केवळ आठवड्याचा कालावधी उरला असला तरी आत्तापर्यंत अनेक कारखान्यांना परवाने मिळाले नाहित. काही कारखान्यांनी एफआरपी पूर्ण दिली नसल्याने कारखान्यांना परवाने मिळताना अडचणी येत आहेत. यातच भर म्हणून यंदा कोविडच्या साथीमुळे कारखान्यांनी लवकर मजूर आणण्याचे टाळले असल्याचे चित्र राज्यातील बहुतांश कारखान्यामध्ये आहे. परिणामी शासनाच्या निर्धारित वेळेत पूर्ण क्षमतेने हंगाम होणे अशक्‍य असल्याचे चित्र आहे.

राज्यात यंदा १९० कारखाने गाळप हंगाम सुरू करण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर तांत्रिक पातळीवर कारखान्यांची सज्जता अंतिम टप्प्यात आहे. परंतु तोडणीसाठी महत्त्वाचे असणारे ऊसतोडणी मजूर व यंत्रांची अद्यापही जुळवाजुळव सुरू असल्याचे चित्र कारखाना स्तरावर आहे. यंदा मजूर टंचाईच्या भीतीने ऊसतोडणी यंत्राला कारखान्यांनी प्राधान्य दिले आहे.

ही तोडणी यंत्रे मोठ्या क्षेत्रातच चालणार असल्याने जर मजूर कमी आले तर छोटे क्षेत्र असणाऱ्या ऊस उत्पादकांची ऊस तोडणी रखडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तोडणीचे नियोजन करण्यात कारखान्यांचे शेती विभाग व्यस्त आहेत. ऊस तोडणी यंत्राने तोडणीची शक्‍यता असणारे क्षेत्र, यंत्राची उपलब्धता, व तोडणी कार्यक्रम याचे वेळापत्रक तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

अंदाज घेऊन मजुरांना बोलावणार
हंगाम सुरू होण्यास अगदी दहा दिवसांचा कालावधी उरला असला तरी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर मजूर आणण्यासाठी कारखाने गडबड करीत नसल्याचे चित्र आहे. अजूनही राज्यात कोविडचे संकट कायम आहे. काही भागात रुग्ण संख्या कमी आढळत आहे. या भागांचा अंदाज घेऊन ऊसतोडणी मजूर आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

प्रतिक्रिया
यंदा संभाव्य मजूर टंचाईमुळे ऊसतोडणी कार्यक्रमात काही बदल करणे अपरिहार्य बनले आहे. यंत्राचा वापर वाढविण्याचे नियोजन आहे. यंत्राने व मजुराने तोडणी होणाऱ्या उसाचे क्षेत्र ठरवूनच तोडणी कार्यक्रम आखावा लागत आहे.
- दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ, जि. कोल्हापूर


इतर अॅग्रो विशेष
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...