agriculture news in Marathi cane crushing will increased in state Maharashtra | Agrowon

ऊस गाळप यंदा वाढणार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे पिछाडीवर पडलेला राज्यातील साखर हंगाम यंदा उसळी घेण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे पिछाडीवर पडलेला राज्यातील साखर हंगाम यंदा उसळी घेण्याची शक्‍यता आहे. ऊस पट्यांमधील जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गाळपाबरोबर उसाचे एकरी टनेजही वाढण्याची शक्‍यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात महापुराची शक्‍यता संपुष्टात आली, यामुळे संभाव्य नुकसान टळले याचा सकारात्मक परिणाम ऊस उत्पादन वाढीवर होणार असल्याचा अंदाज कारखाना प्रतिनिधींचा आहे. 

साखर आयुक्तालयाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा ८१५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी राज्यात ५४५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. पश्‍चिम महाराष्ट्रात महापूर तर उर्वरित राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या हंगामात उसाचे मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर यंदाचा हंगाम वाढीव उसाचा असणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २७० लाख टन उसाचे जादा गाळप होइल असा अंदाज आहे. वाढीव गाळप पहाता यंदा एकूण ९२ लाख टनापर्यंत साखर उत्पादन होवू शकेल. गेल्या वर्षी ६० लाख टन साखर उत्पादन झाले होते 
 

एकरी उत्पादनातही वाढ शक्‍य 
यंदा राज्यातील ऊस पट्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. जूनच्या उत्तरार्धापासून बहुतांशी ठिकाणी चांगला पाऊस झाला. यामुळे गाळपासाठी तयार होणाऱ्या उसाला याचा मोठा फायदा झाला. दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन-तीन दिवस असे पावसाचे स्वरुप राहिल्याने उसाच्या वाढीवर याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. यामुळे सरासरी हेक्‍टरी पाच ते दहा टनापर्यंत उसाचे उत्पादन वाढू शकते असा अंदाज आयुक्तालयाचा आहे. 
 

उसाची लागवड २९ टक्‍यांनी वाढली 
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीतही वाढ दिसून आली आहे. गेल्यावर्षी राज्यात ८.२२ लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होती. यंदा यात वाढ होवून ही ती १०.६६ लाखापर्यंत पोचली आहे. महापुराच्या तडाख्यानंतर अनेकांनी इतर पिकांऐवजी पुन्हा उसाला प्राधान्य दिल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्यात उसाची लागवड वाढल्याचे कारखानदार प्रतिनिधींनी सांगितले. 

यंदा १९० साखर कारखाने हंगाम सुरु करण्याची शक्‍यता आहे. ऑनलाइन परवान्याची प्रक्रीया सुरु आहे. यंदाचा हंगाम १५ ऑक्‍टोबरपासून सुरु होण्याचे नियोजन आहे. कोविडचे संकट, कारखान्यांची तयारी, मजूरांची उपलब्धता यावरच यंदाचा हंगाम प्रत्यक्षात कधी सुरु होइल हे स्पष्ट होणार असल्याचे साखर उद्योगातील सुत्रांनी सांगितले. 

कोल्हापूर विभाग आघाडीवर राहणार 
यंदा कोल्हापूर विभागातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यात गाळपासाठी २.६९ लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी २.३० लाख हेक्‍टर क्षेत्र उसाखाली होते. यामुळे यंदाही उसाच्या गाळपात हे दोन्ही जिल्हे आघाडीवर रहातील, असा अंदाज साखर आयुक्तालयाचा आहे.  

 
 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...