Sugarcane
Sugarcane

सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस लागवड वाढली

जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य भागात सिंचन योजनांचे पाणी आले आणि शेतकऱ्यांनी शेतीसाठी शाश्वत पाण्याची सोय केली. यामुळे गेल्या पाच वर्षात २६ हजार ४३९ हेक्टरने ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य भागात सिंचन योजनांचे पाणी आले आणि शेतकऱ्यांनी शेतीसाठी शाश्वत पाण्याची सोय केली. यामुळे गेल्या पाच वर्षात २६ हजार ४३९ हेक्टरने ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात ७२ हजार ३५९ हेक्टरपर्यंत ऊस लागवड झाली होती. सरासरीपेक्षा कमी लागवड झाल्याने त्या हंगामात कारखान्यांची उसाची पळवापळवी केली होती. दर ही अपेक्षित मिळाला होता. पुढे २०१६-१७ या वर्षात ८० हजार ४४९ हेक्टरने लागवड झाली होती. याचाच अर्थ २०१५-१६ पेक्षा २०१६-१७ या वर्षात ८ हजार ०९० हेक्टरने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, पलूस, मिरज या भागात आडसाली हंगामातील उसाची लागवड अधिक केली जाते. या परिसरात एकरी शंभर टन उत्पादन घेणार शेतकरी अधिक आहेत. तसेच हे शेतकरी परिसरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शनही करतात. त्यामुळे ऊस लागवडीसाठी शेतकरी पुढे येत आहेत. मुळात, आटपाडी, कवठेमहंकाळ, जत, आणि तासगावात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या भागात ताकारी, टेंभू, आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी फिरले. आवर्तने वेळेत होऊ लागली. इथल्या शेतकऱ्यांनी शाश्वत पाण्याची सोय केली. त्यामुळे या भागात देखील ऊस लागवडीचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. जत तालुक्यात २०१८-१९ मध्ये ९०० हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. तर सन २०१९-२० मध्ये १५०० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली. जिल्ह्यात दरवर्षी पाच ते सात हजार हेक्टरने होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार दिसते आहे. वर्षनिहाय ऊस लागवड (हेक्टरमध्ये)

वर्ष   ऊस क्षेत्र 
२०१६-१७   ७२ हजार ३५९
२०१७-१८ ८० हजार ४४९
२०१८-१९ ८९ हजार ९१८
२०१९-२०  ९५ हजार ८२७
२०२०-२१  ९८ हजार ९७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com