agriculture news in Marathi cane planting up by 26 thousand in Sangali District Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस लागवड वाढली

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य भागात सिंचन योजनांचे पाणी आले आणि शेतकऱ्यांनी शेतीसाठी शाश्वत पाण्याची सोय केली. यामुळे गेल्या पाच वर्षात २६ हजार ४३९ हेक्टरने ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य भागात सिंचन योजनांचे पाणी आले आणि शेतकऱ्यांनी शेतीसाठी शाश्वत पाण्याची सोय केली. यामुळे गेल्या पाच वर्षात २६ हजार ४३९ हेक्टरने ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात ७२ हजार ३५९ हेक्टरपर्यंत ऊस लागवड झाली होती. सरासरीपेक्षा कमी लागवड झाल्याने त्या हंगामात कारखान्यांची उसाची पळवापळवी केली होती. दर ही अपेक्षित मिळाला होता. पुढे २०१६-१७ या वर्षात ८० हजार ४४९ हेक्टरने लागवड झाली होती. याचाच अर्थ २०१५-१६ पेक्षा २०१६-१७ या वर्षात ८ हजार ०९० हेक्टरने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती.

जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, पलूस, मिरज या भागात आडसाली हंगामातील उसाची लागवड अधिक केली जाते. या परिसरात एकरी शंभर टन उत्पादन घेणार शेतकरी अधिक आहेत. तसेच हे शेतकरी परिसरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शनही करतात. त्यामुळे ऊस लागवडीसाठी शेतकरी पुढे येत आहेत.

मुळात, आटपाडी, कवठेमहंकाळ, जत, आणि तासगावात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या भागात ताकारी, टेंभू, आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी फिरले. आवर्तने वेळेत होऊ लागली. इथल्या शेतकऱ्यांनी शाश्वत पाण्याची सोय केली. त्यामुळे या भागात देखील ऊस लागवडीचे प्रमाण देखील वाढू लागले आहे.

जत तालुक्यात २०१८-१९ मध्ये ९०० हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. तर सन २०१९-२० मध्ये १५०० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली. जिल्ह्यात दरवर्षी पाच ते सात हजार हेक्टरने होत असल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार दिसते आहे.

वर्षनिहाय ऊस लागवड (हेक्टरमध्ये)

वर्ष   ऊस क्षेत्र 
२०१६-१७   ७२ हजार ३५९
२०१७-१८ ८० हजार ४४९
२०१८-१९ ८९ हजार ९१८
२०१९-२०  ९५ हजार ८२७
२०२०-२१  ९८ हजार ९७०

इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...