परभणीत ढोबळी मिरची प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये

ढोबळी मिरची
ढोबळी मिरची

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१०) ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होती. त्यास २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. पालकांची १२ क्विंटल आवक होती त्यास १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कोथिंबिरची २५ क्विंटल आवक होती, तीस २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होती, तीस प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये दर मिळाले. वांग्याची १५ क्विंटल आवक होती त्यास ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ४५० क्विंटल आवक होती त्यास २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक होती, तीस २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गवारीची ९ क्विंटल आवक होती, तीस २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. भेंडीची ८ क्विंटल आवक होती, भेंडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. दोडक्याची ५ क्विंटल आवक होती, त्यास ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होती, त्यास ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक होती, तीस १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक होती, तीस १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. फ्लाॅवरची २५ क्विंटल आवक होती, फ्लाॅवरला २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. दुधी भोपळ्याची ८ क्विंटल आवक होती, त्यास १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मुळ्याची ४ हजार नग आवक होती, त्यास ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. लिंबाची ३० क्विंटल आवक होती, त्यास १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. पपईची १५ क्विंटल आवक होती.पपईला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com