नाशिकमध्ये ढोबळी मिरची १७५० ते ३१२५ रुपये प्रतिक्विंटल

Capsicum per quintal 1750 to 3125 in Nashik
Capsicum per quintal 1750 to 3125 in Nashik

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी मिरचीची आवक २५३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १७५० ते ३१२५ दर होता. सरासरी दर २५०० राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात वांग्याची २२७ क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० असा दर होता. त्यास सरासरी दर १००० राहिला. फ्लॉवरची आवक ९९४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७८५ ते १५०० दर होता. सरासरी दर ११४२ राहिला. कोबीची आवक ९९४ क्विंटल झाली. तिला सरासरी ५०० ते ११६६ असा दर होता. सर्वसाधारण दर ७९१ राहिले. पिकॅडोर मिरचीची आवक ५८ क्विंटल झाली. तिला ११२५ ते २१८७ दर होता. तर सर्वसाधारण दर १५६७ राहिला. 

भोपळ्याची आवक ११०६ क्विंटल होती. त्यास २६६ ते ८३३ असा दर होता. सर्वसाधारण दर ६०० राहिला. कारल्याची आवक ४१३ क्विंटल झाली. त्यास १०८३ ते २०८३ असा दर होता. सर्वसाधारण दर १६२५ राहिला. दोडक्याची आवक ११८ क्विंटल झाली. त्यास ११२५ ते १६६८ असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर १३३३ राहिला. गिलक्याची आवक ८८ क्विंटल होती. त्यास ५८३ ते १०४१ दर होता. सर्वसाधारण दर ७९१ राहिला. 

भेंडीची आवक ३६ क्विंटल झाली. त्यास १६६५ ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २०८५ राहिला. गवारची आवक २९ क्विंटल झाली. तिला २५०० ते ३३०० असा दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. डांगराची आवक २० क्विंटल झाली. त्यास १२०० ते १६०० दर होता. सर्वसाधारण दर १४०० राहिला. काकडीची आवक १०९४ क्विंटल झाली. तिला ६०० ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ७५० राहिला. लिंबूची आवक ३५ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १५०० असा दर होता. सर्वसाधारण दर १२५० राहिला. 

बटाट्याची आवक १५६५ क्विंटल झाली. त्यास १५५० ते २३५० दर होता. सर्वसाधारण दर १८५० होता. लसणाची आवक २५ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ६५०० ते १७००० दरम्यान होता. सरासरी दर १३००० होता. फळांमध्ये पेरूची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास १००० ते २५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १८५० राहिला. डाळिंबाची आवक ३२५ क्विंटल झाली. त्यास ४५० ते ५७४० दर होता. सर्वसाधारण दर ३५०० राहिला. केळीची आवक ४० क्विंटल झाली. तिला ५०० ते ११०० सर्वसाधारण दर मिळाला. सरासरी भाव ९०० होता. बोराची आवक १४६ क्विंटल झाली. त्यास ९०० ते २२०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिला. मोसंबीची आवक २३ क्विंटल झाली. तिला २५०० ते ६००० सर्वसाधारण दर मिळाला. सरासरी भाव ४००० होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com