agriculture news in marathi Care to be taken while wrapping grape bunch with paper | Page 3 ||| Agrowon

द्राक्ष घडांना पेपर लावतेवेळी घ्यावयाची काळजी

प्रा. योगेश भगुरे, प्रा. दीपक पाटील
गुरुवार, 2 जानेवारी 2020

द्राक्ष पीक अन्य पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असले तरी पीक संरक्षणासह अन्य बाबींवरील खर्चही मोठा असतो. हे फळ अत्यंत नाजूक असून, बदलत्या वातावरणात द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन हे दिवसेंदिवस आव्हानात्मक बनले आहे. यासाठी घडांना पेपर लावण्याची कार्यवाही केली जाते.
 

द्राक्ष पीक अन्य पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असले तरी पीक संरक्षणासह अन्य बाबींवरील खर्चही मोठा असतो. हे फळ अत्यंत नाजूक असून, बदलत्या वातावरणात द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन हे दिवसेंदिवस आव्हानात्मक बनले आहे. यासाठी घडांना पेपर लावण्याची कार्यवाही केली जाते.
 
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष घडामध्ये योग्य आकाराचे मणी, एकसारखा आकर्षक रंग, गोडी, कीड-रोग विरहीत, कीडनाशकांचे अवशेषमुक्त घड आवश्यक असतो. तसेच अलीकडच्या काळातील वातावरणातील बदलांमुळे सनबर्निंग, पिंकबेरी यांसारख्या समस्या वाढलेल्या आहेत. या समस्या टाळून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मिळवण्याकरिता द्राक्ष घडांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावणे अत्यंत गरजेचे आहे.

घडांना पेपर लावण्याआधी करावयाची पूर्वतयारी

१) द्राक्ष घडांना पेपर लावण्याची योग्य अवस्था

साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर पेपर लावावे. कारण या अगोदर बागेत कीडरोगाचे उत्तम प्रकारे नियंत्रण करून घ्यावे. घडांना पेपर लावल्यानंतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.

२) घड व मणी विरळणी  

निर्यातीसाठी आवश्यक असलेला मण्यांचा आकार, घडाची लांबी, सुटसुटीत व एकसारखेपणा, गोडी या निकषाप्रमाणे मिळण्यासाठी वेलीवरील घडांची संख्या, प्रत्येक घडातील मण्यांची संख्या योग्य असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी पेपर लावण्याअगोदर वेलीचे वय, लागवडीचे अंतर, जात इ. गोष्टींचा विचार करून घडांची संख्या निर्धारित करावी. एकसारख्या वाढीचे, आकर्षक, कीड रोगविरहीत घड वेलीवर ठेवावेत. कीड-रोगांचा प्रादुर्भाव असलेले, पानांच्या आड, गर्दीत असलेले, एकसारखा आकार नसलेले जास्तीचे घड काढून टाकावेत. तसेच खराब, कमी आकाराचे, गर्दी करणारे मणी काढून जातीपरत्वे प्रत्येक घडात मणी संख्या निर्धारित करावी. यामुळे प्रत्येक वेलीवर योग्य घड व मणी संख्या राहून निर्यातक्षम उत्पादन मिळण्यास मदत होईल.

३) काडी व घडांची बांधणी

पेपर लावण्याआधी काड्यांची व घडांची बांधणी करून घ्यावी. त्यामुळे पेपर लावणे सोयीचे होईल.

४) कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रतिबंधात्मक फवारणी

एकदा द्राक्ष बागेत पेपर लावल्यानंतर आपण फवारणीद्वारे वापर केलेल्या कीटकनाशकांचा घडांशी संपर्क येत नाही. त्यामुळे पेपर लावण्याआधी कीडनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे. किडींमध्ये प्रामुख्याने मिलीबग(पिठ्या ढेकूण)चे नियंत्रण महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिफारशीनुसार व्हर्टीसिलीयम लेकॅनीसारख्या जैविक कीडनाशकांचा वापर उपयुक्त ठरू शकतो.

त्याचप्रमाणे द्राक्ष बागेमध्ये विविध रोगांचा उदा. केवडा, भुरी, करपा इ. प्रादुर्भाव होतो. यासाठी पेपर लावण्याआधी ट्रायकोडर्मा व्हीरीडी, बॅसीलस सबटीलीस यांसारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर महत्त्वाचा ठरतो. यासाठी रासायनिक कीटकनाशकांची, बुरशीनाशकाची त्यांचा काढणीपूर्व कालावधी विचारात घेऊन फवारणी घ्यावी. यामुळे रोगनियंत्रण होऊन रासायनिक औषधांचे अवशेष कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारे सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर कुशल मजुरांद्वारे घडांना इजा न करता, किमन हाताळणी करत योग्य अवस्थेत पेपर लावण्याचे काम पूर्ण करावे.

द्राक्ष घडांना पेपर लावण्याचे फायदे 

 • द्राक्ष घडांचे ऊन व त्यामुळे होणाऱ्या सनबर्निंगसारख्या समस्यांपासून संरक्षण होते.
   
 • घडांचे थंडीपासून संरक्षण होऊन मण्यांचा योग्य आकार मिळण्यास मदत होते.
   
 • पिंक बेरी या समस्येपासून मुक्तता मिळते. किंबहुना ही समस्या टाळण्यासाठी हा एकमेव उपाय आहे.
   
 • घडांचे पक्षी, प्राणी इ. यांपासून होणारे नुकसान टाळता येते.
   
 • द्राक्ष काढणी वेळी निर्यातीसाठी आवश्यक मण्यांचा आकार, आकर्षक एकसारखा रंग मिळून निर्यातक्षम मालाचे उत्पादन वाढून अधिक आर्थिक फायदा मिळतो.

पेपर लावण्याआधी व नंतर करावयाची कार्यवाही

 • घड व मणी विरळणी
 • कीटकनाशक व बुरशीनाशक यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर
 • कुशल मजुरांचा उपयोग करून घडांना इजा न करता, कमीत कमी हाताळणी करून पेपर लावावे.
 • पेपर लावल्यानंतर ठराविक काळाने प्रातिनिधिक स्वरूपात घडांची मिलीबग, भुरी इ.साठी तपासणी करावी.

 अशा प्रकारे काळजी घेऊन पेपर लावल्यास निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन वाढून जास्त आर्थिक फायदा मिळू शकतो.

संपर्कः. योगेश भगुरे, ९९२२४१४८७३
(उद्यान विद्या विभाग, के.डी.एस.पी कृषी महाविद्यालय, नाशिक.)


इतर फळबाग
सीताफळात योग्य परागसिंचन होणे आवश्यकसीताफळाची फळधारणा तापमानावर जास्त अवलंबून...
नारळाला द्या शिफारशीत खतमात्रानारळ झाडाच्या सभोवताली पहिले वर्ष १ फूट, दुसरे...
असे करा लिंबूवर्गीय फळपिकांचे व्यवस्थापनसध्या काही संत्रा बागांना पूर्ण ताण बसून आंबिया...
दीड वर्षात पपईसह पाच पिकांचा 'तनपुरे...पपईच्या दीर्घ कालावधीच्या पिकात कांदा, पपई...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
द्राक्ष रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापनसध्याच्या वातावरणाचा विचार करता किमान...
केळी सल्लासूत्रकृमीग्रस्त जमिनीस खोल नांगरट देऊन उन्हात २...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...
अशी करा नवीन द्राक्ष लागवडीची तयारीद्राक्ष लागवडीसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे....
गारपीटग्रस्त संत्रा बागेसाठी उपाययोजनामराठवाड्यातील काही भागांसह विदर्भात पुन्हा पाऊस व...
भुरी, मिलिबग नियंत्रणासाठी उपाययोजना...सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये काही...