Agriculture news in marathi Care of farmers at the mouth of sowing for crop loan in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात पीककर्जासाठी पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची हेळसांड

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

तलाठी, अन्य गावपातळीवरील कर्मचारी गावात यायला तयार नाहीत. त्यामुळे पीककर्जासाठी अर्ज द्यायचा तरी कुणाकडे. पेरणी तोंडावर आलेली, पण अजून पीककर्ज मिळालेले नाही. संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावे. शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज वाटप करावे. 
- पंडित थोरात, शेतकरी, खानापूर. 

पीककर्ज मागणीसाठी सध्याच्या पध्दतीत बदल करावा. लिंकव्दारे ऑनलाइन नोंदणी सुरु करावी.त्यामुळे 
गावातूनच पीककर्जाची मागणी करता येईल. 
- केशव आरमळ, मांडवा. 

शेतकऱ्यांनी पीककर्जसाठी केलेल्या अर्जाची बॅंकनिहाय माहिती घेतली जात आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- पांडुरंग निनावे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक, परभणी. 
 

परभणी : जिल्ह्यातील अनेक गावातील तलाठी पीककर्ज मागणी अर्ज घेण्यासाठी गावांत येत नाही. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची हेळसांड सुरु आहे. ऑनलाइन पध्दतीने अर्ज घेऊन पीककर्ज वाटपाला गती द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली. 

दरम्यान, यंदाच्या खरिपात १ हजार ५६७ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजवर २७ हजार १५० शेतकऱ्यांना ९८ कोटी २१ लाख रुपये (६.२७ टक्के) एवढे पीक कर्जवाटप झाले आहे. कोरोना रोखण्यासाठी यंदा खरीप पीककर्जासाठी बॅंकांमधील शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या parbhani.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पीककर्ज मागणी अर्जाचा नमुना उपलब्ध केला आहे. हा अर्ज डाऊनलोड करावा किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून घ्यावा. तो आवश्यक कागदपत्रांसह सबंधित तलाठयाकडे सादर करावा. तलाठ्यांनी गावनिहाय अर्ज संकलित करुन ते तहसील कार्यालयात जमा करावे. 

संबंधित बँकांनी तहसिल कार्यालयाकडील अर्ज प्राप्त करुन घ्यावे. त्यावर पुढील कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले. परंतु, या आदेशाकडे अनेक गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या कर्मचाऱ्यासह सरपंच दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत कार्यालयात अद्याप पीककर्जाचे अर्ज उपलब्ध झालेले नाहीत. काही ठिकाणी अर्ज उपलब्ध झाले. परंतु, तलाठी, अन्य कर्मचारी ते अर्ज जमा करुन घेत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहेत. 

पेरणीसाठी बि-बियाणे, खते खरेदीसाठी वेळेवर पीककर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आजवर पीककर्जासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येची माहिती देखील संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नाही. पीककर्ज वाटपाची गती अतिशय संथ आहे. पेरणीची वेळ जवळ येऊन ठेपलेली असताना पीककर्जाअभावी शेतकऱ्यांची हेळसांड सुरु आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...