भुईमूग काढणीवेळी घ्यावयाची काळजी

भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत. सध्या भुईमूग पीक काढणीच्या अवस्थेमध्ये असून, पिकाची काढणी काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने करावी. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवता येईल.
care sholud be taken while  harvesting the groundnut
care sholud be taken while harvesting the groundnut

भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत. सध्या भुईमूग पीक काढणीच्या अवस्थेमध्ये असून, पिकाची काढणी काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने करावी. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळवता येईल. शेंगा पक्व झाल्यानंतर भुईमूगाची पान पिवळी पडतात आणि पानगळ सुरू होते. पक्वता किती आहे हे पाहण्यासाठी भुईमूग उपटून पहावा. पक्व झाल्यानंतर शेंगाचे टरफल टणक होते. शिवाय जातिनुसार ते आतून काळे पडत शेंगदाण्याचा रंगही बदलतो. एका झाडावरील सरासरी ७५ टक्के शेंगा पक्व झाल्यावर भुईमूग काढणीस आला असे समजावे. योग्य पक्वतेच्या भुईमूगाची काढणी न केल्यास शेंगांच्या उत्पादनात लक्षणीय घट येते.

  • भुईमूग काढणीच्या काळात माघारीचा पाऊस येऊन गेल्यास किंवा जमिनीमध्ये ओल असल्यास शेंगांना जागेवरच मोड येतात. अनेकवेळा यामुळे उत्पानामध्ये ५० टक्क्यांपर्यंतसुद्धा नुकसान झालेले दिसते.
  • भुईमूगाची काढणी करतांना भुईमूगाच झाड उपटणे आणि त्यावेळी शेंगाची तोडणी करणे ही महत्वाची काम असतात. काढणी करतांना जमिनीत पुरेसा ओलावा आणि वापसा असणे गरजेचे आहे. जमीन टणक असल्यास बैलचलित अवजारांचा वापर करावा.
  • काढणी केलेल्या शेंगा उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात. शेंगामधील पाण्याच प्रमाण ७ टक्केपर्यंत आल्यानंतर शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
  • शेंगाची साठवणूक करीत असतांना साठवणूकीची खोली किंवा कोठी स्वच्छ असावी. कोठ्याच्या आतल्या बाजूस पांढरा रंग किंवा चुना दिला तर त्या कोठारामध्ये साठवणुकीतील अन्य किडींचा प्रादुर्भावाची शक्यता कमी होते. कोठारामध्ये शेंगा ठेवताना पोत्यामध्ये भरून ठेवाव्यात. प्रत्येक महिण्यामध्ये एकदा त्यांची तपासणी करावी.
  • भुईमूगाचा पाला जनावरांच्या खाद्यामध्ये वापरला जातो. मात्र, त्यासाठी पाला वापरताना तो भिजणार नाही, याची काळजी घ्यावी. ओलाव्यामुळे बुरशींचा प्रादुर्भाव होऊन जनावरे आजारी पडू शकतात. भुईमूगाचा पाला उन्हात चांगला वाळवून घ्यावा. त्यानंतरच तो जनावारांना खावू घालावा.
  • काढणी करत असतांना उपट्या (स्पॅनिश) जातीमध्ये आपण हातांनी उपटून शेंगा काढत असतो. शेंगा काढल्यानंतर वेल हे शेतामध्येच ठेवतो. पावसाची शक्यता असल्यास त्यांची सुरक्षित जागी साठवण करावी.
  • संपर्क- डॉ. राजेंद्र भाकरे, ८६००५९२८९४ डॉ. दिलीप कठमाळे, ९४०५२६७०६१ (कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रस, जि. सांगली.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com