तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा ः अजित पवार

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन तालुक्यात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
Carefully plan for the third wave: Ajit Pawar
Carefully plan for the third wave: Ajit Pawar

बारामती ः तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करा. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन तालुक्यात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे योग्य प्रकारे नियोजन करा, सुपे येथे कोविड सेंटर उभारण्यासाठी तत्काळ कार्यवाही करा, असे आदेश उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. २) तालुक्यात कोरोना आढावा बैठक झाली. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्‍वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के आदींसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी प्रशासनास कडक निर्बंध लावण्याबाबतचे पूर्ण अधिकार दिले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी मनुष्यबळ कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्याबाबत या वेळी सांगितले.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे या त्रिसूत्रीवर भर द्यावा. तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असेही पवार यांनी या वेळी आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com