Karle Bajarbhav : नाशिकमध्ये कारले ११४२ ते १८५७ रुपये प्रतिक्विंटल

 Carle Rs 1142 to 1857 per quintal In Nashik
Carle Rs 1142 to 1857 per quintal In Nashik

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कारल्याची आवक ४१६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १०४१ ते २५०० रुपये दर होता. सरासरी दर २००० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

वांग्यांची २५५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० असा दर होता. त्यास सरासरी दर १००० राहिला. फ्लॉवरची आवक ४४३ क्विंटल झाली. तिला सरासरी १३५७ ते २३९२ असा दर होता. सर्वसाधारण दर १८५७ रुपये राहिले. ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

कोबीची आवक १०२३ क्विंटल झाली. तिला सरासरी ७०८ ते १३३३ असा दर होता. सर्वसाधारण दर ९१६ राहिले. ढोबळी मिरचीची आवक २५८ क्विंटल झाली. तिला १२५० ते ४६८७ दर होता. सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. पिकॅडोरची आवक ५८ क्विंटल झाली. तिला १०६२ ते २५०० दर होता तर सर्वसाधारण दर १८७५ राहिला.

भोपळ्याची आवक ९८१ क्विंटल होती. त्यास २६६ ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ५३३ राहिला. दोडक्याची आवक १२१ क्विंटल झाली. त्यास १२०८ ते ४१६६ असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ३०८६ राहिला. गिलक्याची आवक ८६ क्विंटल होती. त्यास ६२५ ते २०८३ दर होता. सर्वसाधारण दर १४१६ राहिला. भेंडीची आवक ६० क्विंटल झाली. त्यास २०८५ ते २८३५ दर होता. सर्वसाधारण दर २५ ०० राहिला. ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

गवारची आवक ३५ क्विंटल झाली. तिला ३५०० ते ६००० असा दर होता. सर्वसाधारण दर ५००० राहिला. डांगराची आवक २० क्विंटल झाली. त्यास १२०० ते २००० दर होता. सर्वसाधारण दर १५०० राहिला. काकडीची आवक ९२२ क्विंटल झाली. तिला ७५० ते १७५० असा दर होता. सर्वसाधारण दर १३०० राहिला. लिंबांची आवक ३६ क्विंटल झाली. त्यास ७०० ते १५०० असा दर होता. सर्वसाधारण दर १२५० रूपये राहिला.

बटाट्याची आवक १६५५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २३०० दर होता. सर्वसाधारण दर १९०० होता. लसणाची आवक ५७ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ६२०० ते १६८०० दरम्यान होता. सरासरी दर १२५०० रुपये होता.

फळांमध्ये डाळिंबांची आवक ५९२ क्विंटल झाली. त्यास ३०० ते ६१२५ दर होता. सर्वसाधारण दर ३७५० राहिला. ओल्या नारळाची आवक २०१ क्विंटल झाली. त्यास २३०० ते ३५०० सर्वसाधारण दर मिळाला. सरासरी भाव २८०० होता. संत्रीची आवक १४० क्विंटल झाली. त्यास १९०० ते ४००० दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com