agriculture news in marathi, carrot, cucumber rate up as vegetable are stable in solapur | Agrowon

सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले, भाजीपालाही टिकून
सुदर्शन सुतार
मंगळवार, 22 मे 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडीला मागणी वाढली. त्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दर वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजीपाल्याच्या दरातील तेजीही पुन्हा टिकून राहिली. 

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडीला मागणी वाढली. त्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दर वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजीपाल्याच्या दरातील तेजीही पुन्हा टिकून राहिली. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीची १० ते २० क्विंटल, गाजराची ८ ते १० क्विंटल अशी आवक झाली. गाजर आणि काकडीची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक खूपच कमी राहिली. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे गाजर आणि काकडीला मागणी वाढत आहे. येत्या काही दिवसांत ही मागणी आणखी वाढण्याची आणि दरही वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

काकडीला प्रतिदहा किलोसाठी ४० रुपये, सरासरी १२० रुपये आणि सर्वाधिक २५० रुपये असा दर मिळाला. गाजराला किमान ४० रुपये, सरासरी १०० रुपये आणि सर्वाधिक २०० रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन आठवड्यांपासून गाजर आणि काकडीला उठाव कमीच होता आणि आवकही तुलनेने कमीच होती. या सप्ताहात मात्र त्याच्या आवकेत काहीशी घट असली, तरी दर मात्र चांगलेच वधारलेले राहिले.

त्याशिवाय ढोबळी मिरची, हिरवी मिरची, भेंडीचे दरही पुन्हा वधारलेलेच राहिले. त्यांची आवक ही तुलनेने कमीच होती. प्रत्येकी ३० ते १०० क्विंटलपर्यंत आवक होती. ढोबळी मिरचीला प्रतिदहा किलोसाठी किमान ८० रुपये, सरासरी १४० रुपये आणि सर्वाधिक २२० रुपये, हिरव्या मिरचीला किमान ८० रुपये, सरासरी १५० रुपये आणि सर्वाधिक २७५ रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याचे दरही पुन्हा टिकून राहिले.

गेल्या दोन आठवड्यापासून भाजीपाल्यालाही मागणी वाढलेली दिसून आली. भाज्यांची आवक १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंतच असते, पण या सप्ताहात त्यात पुन्हा थोडीशी घट झाली. भाज्याही स्थानिक भागातूनच आल्या. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते १३०० रुपये, शेपूला ६०० ते ८०० रुपये आणि मेथीला ६०० ते १००० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...