कृषी विद्यापीठात गाजर गवत निर्मूलन सप्ताह

कृषी विद्यापीठात गाजर गवत निर्मूलन सप्ताह
कृषी विद्यापीठात गाजर गवत निर्मूलन सप्ताह
अकोला : गाजर गवताविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने गाजरगवत निर्मूलन जागरुकता सप्ताह देशभर एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित तण व्यवस्थापण संशोधन प्रकल्प, कृषी विद्या विभागाच्या पुढाकाराने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. 
सप्ताहाचा समारोप गुरुवारी (ता. २३) करण्यात आला. विद्यापीठातील कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते कृषिविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील गाजर गवतावर उपजीविका करून नष्ट करणारे मेक्सिकन भुंगे सोडण्यात आले.
याप्रसंगी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने, पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे, वनविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय. बी. तायडे, कृषी विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी. व्ही. सावजी, प्रा. डॉ. सुधीर वडतकर, डॉ. आर. एन. काटकर, डॉ. एम. एस. खाकरे,  डॉ. ए. एन. पसलावर, डॉ. एन. आर. पोटदुखे , डॉ. आर. जी. देशमुख, डॉ. किशोर बिडवे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com