नाशिकमध्ये गाजराच्या दरात क्विंटलमागे ६०० रुपयांनी वाढ

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये गाजराची आवक ५५७९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २०००, तर सरासरी दर १६०० रुपये राहिला. आवक टिकून आहे.
Carrot prices in Nashik An increase of Rs. 600 per quintal
Carrot prices in Nashik An increase of Rs. 600 per quintal

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहामध्ये गाजराची आवक ५५७९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २०००, तर सरासरी दर १६०० रुपये राहिला. आवक टिकून आहे. चालु सप्ताहात सरासरी दरात ६०० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. १७०२९ ती  क्विंटल झाली. आवकेत वाढ होऊनही मागणी असल्याने दरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २३०० मिळाला. सरासरी दर १९०० रुपये राहिला. 

लसणाची आवक ६०४क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ११५००, तर सरासरी दर ६४०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५०२० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५५० ते १४००, तर सरासरी दर १०५० रुपये राहिला. आल्याची आवक ७४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ३२५१, तर सरासरी दर २७५० रुपये राहिला. मागणीमुळे दरात वाढ झाली आहे.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ-उतार झाला. वालपापडी-घेवड्याची आवक ६५५ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ४००० ते १११००, तर सरासरी दर ९००० रुपये दर राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ८५०० ते ११०००, तर सरासरी दर १०२०० रुपये दर राहिला. हिरव्या मिरचीची आवक १९०४  क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २०००ते ३५०० रुपये, तर सरासरी दर २५०० रुपये दर मिळाला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते १४०, तर सरासरी १००, वांगी ४०० ते ७००, तर सरासरी ५५० व फ्लॉवर ७० ते २०० सरासरी १४० रुपये दर प्रति १४ किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला २०० ते २७५, तर सरासरी दर २५० रुपये प्रति ९ किलोस मिळाले.

फळांमध्ये केळीची आवक १२८० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १२५०, तर सरासरी दर १०५० रुपये मिळाला. डाळिंबांची आवक ३४७७ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४०० ते ९७५०, तर सरासरी ६५०० रुपये दर मिळाला. आंब्यांची आवक २५६३ क्विंटल झाली. केशर आंब्याला  प्रतिक्विंटल ६००० ते १००००, तर सरासरी दर ८००० रुपये होता. बदाम आंब्याला प्रतिक्विंटल २५०० ते ५०००, तर सरासरी दर ३५०० रुपये होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com