Agriculture news in Marathi, Carrot rate improvement; Increased trend in milk pumpkin | Agrowon

गाजराच्या दरात सुधारणा; दुधी भोपळ्यात वाढीचा कल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ६) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पुणे जिल्ह्यासह विविध भागांत सातत्याने होणाऱ्या पावसामुळे भिजलेल्या फुलांची आवक वाढली होती. तर भाजीपाल्यामधील आवक स्थिर होती. पालेभाज्यामध्ये कोथिंबिरीची सुमारे २ लाख, तर मेथीची सुमारे ३५ हजार जुड्यांची आवक झाली होती. आवक घटल्याने टोमॅटो, दुधी भोपळा, गाजर, घेवडाच्या दरात वाढ झाली होती. कांद्याचे थोडे दर वाढले होते.  

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ६) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. पुणे जिल्ह्यासह विविध भागांत सातत्याने होणाऱ्या पावसामुळे भिजलेल्या फुलांची आवक वाढली होती. तर भाजीपाल्यामधील आवक स्थिर होती. पालेभाज्यामध्ये कोथिंबिरीची सुमारे २ लाख, तर मेथीची सुमारे ३५ हजार जुड्यांची आवक झाली होती. आवक घटल्याने टोमॅटो, दुधी भोपळा, गाजर, घेवडाच्या दरात वाढ झाली होती. कांद्याचे थोडे दर वाढले होते.  

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, कर्नाटकातून श्रावणी घेवडा सुमारे २ टेम्पो, गुजरात येथून भुईमूग सुमारे ३ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी, तर आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० गोणी, टॉमेटो सुमारे ४ हजार क्रेट, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा (डांगर) भेंडी प्रत्येकी सुमारे ८ ते १० टेम्पो, गवार सुमारे ७ टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, काकडी १५ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे २०० गोणी, तसेच कांदा सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ३२०-३६०, बटाटा : १२०-१८०, लसूण : १२००-१६००, आले : सातारी ३००-६००, भेंडी : २५०-३००, गवार : ३००-५००, टोमॅटो : २५०-३००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : १००-२००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १४०-१५०, पापडी : ३००-४००, पडवळ : २४०-२५०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : १२०-१६०, वांगी : २००-३००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ४००-४५०, गाजर : ३००-५००, वालवर : ३००-३५०, बीट : १४०-१६०, घेवडा : १००-१५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००- ४५०, मटार : १०००-१२००, तांबडा भोपळा : १००-१५०, सूरण : २५०-३००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ८०० -१०००, मेथी : ८००-१२००, शेपू : ४००-६००, कांदापात : १००० -१५००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ५०० -८००, पुदिना : २०० -४००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५०० -८००, चुका : ८००-१०००, चवळई : ५०० -८००, पालक : १२०० -१५००.

फुलबाजार
सततच्या पावसामुळे झेंडूची फुले भिजल्याने विजयादशमीला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या आवकेतील ५० टक्के फुले भिजलेली असल्याने चांगल्या फुलांना दर चांगले होते. तर शेवंतीच्या फुलांना मागणी वाढल्याने दर वाढले होते.   

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-५०, बिजली : ६०-१२०, कापरी : ३०-६०, शेवंती : १००-१५०, अ‍ॅस्टर : २०-४०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ३०-५०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१००, लिली बंडल : १५-२५,  जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१२०.

फळबाजार 
रविवारी (ता. ६) येथील बाजारात मोसंबी सुमारे ८० टन, संत्री ८ टन, डाळिंब २०० टन, कलिंगड २५ टेम्पो, खरबूज ५ टेम्पो, पपई २५ टेम्पो, लिंबे सुमारे तीन हजार गोणी, पेरू ४०० क्रेटस, चिकू एक हजार डाग, तर सीताफळाची दहा टन आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २००-५००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ७०-१६०, संत्रा : (३ डझन) : १२०-२८०, (४ डझन) : ५०-१३०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१२०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-३०, पपई : १०-३०, चिकू : १००-७००, पेरू (२० किलो) : ७००-८००, सीताफळ : ३०-१७०, सफरचंद :  सिमला (२५ ते ३० किलो) १६००-२४००, किन्नोर : २०००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) १०००-१४००, अमेरिकन (१५ किलो) १०००-११००, पिअर (१५ किलो) १०००-१२००.

मासळी बाजार
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. ६) खोल समुद्रातील मासळीची सुमारे सहा टन, खाडीची ३०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे ६०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे पाच टन आवक झाली होती. सध्या नवरात्रींचे उपवास सुरू असल्याने मागणी आणि दर स्थिर होते. तर दसऱ्यानंतर मागणी वाढल्यानंतर दर वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, चिकन, गावरान अंडी व मटणाचीही मागणी आणि दर टिकून आहेत. तर, आवक घटल्याने इंग्लिश अंड्याच्या भावात १० रुपयांनी वाढ झाली आहे.

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००, मोठे १४००, मध्यम : ८००-९००, लहान ६००-६५०, भिला : ४५०-५००, हलवा : ५००-५५०, सुरमई : ४८०-५००, रावस : ५५०, घोळ : ४८०, भिंग : ३२०, करली : २८०, करंदी : ३२०-३६०, पाला : ७००-१२००, वाम : पिवळी ४००-६५०,  काळी : २८०-३६०, ओले बोंबील : ६०-१२०, कोळंबी 
१६०-४८०, जंबो प्रॉन्स : १३००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १३००, मोरी : १६०-२४०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०. 

खाडीची मासळी  
सौंदाळे : २४०, खापी : १६०-२००, नगली : ३६०-५५०, तांबोशी : ४००-४४०, 
पालू : २००, लेपा : १२०-२००, शेवटे : २४०, बांगडा : १६०-२४०, पेडवी : ८०, बेळुंजी : १००-१६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, 
तारली : १४०. 
नदीची मासळी 
रहू : १४०, कतला : १६०, मरळ : २८०-३६०, शिवडा : २४०, चिलापी : ८०, खवली : १६०, आम्ळी : १२०, खेकडे : २००-२४०, वाम : ४८०. 
मटण  
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५८०. 
चिकन  
चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. 
अंडी  
गावरान : शेकडा : ७२० डझन : ९६ प्रतिनग : ८. इंग्लिश : शेकडा : ४५५ डझन : ६० प्रतिनग : ५.
 


इतर ताज्या घडामोडी
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...
‘कोरोना’च्या चाचणी, रोगनिदानासाठी...परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान...
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू...बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४)...
अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढमागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस,...
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने...अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर,...
शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन...नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी...
पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध...पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह...
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...