agriculture news in marathi Carrots in Parbhani 1500 to 2500 rupees | Agrowon

परभणीत गाजर १५०० ते २५०० रुपये

टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 डिसेंबर 2020

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.४) गाजरांची ५०१ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २५००, तर सरासरी २००० रुपये दर मिळाले.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.४)  गाजरांची ५०१ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २५००, तर सरासरी २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यामध्ये वाटाण्याची ७० क्विंटल आवक होऊन २५०० ते ४५०० रुपये, तर सरासरी ३५०० रुपये दर मिळाले. शेवग्याची ८ क्विंटल आवक झाली. दर ३००० ते ५०००, तर सरासरी ४००० रुपये मिळाले. गवारीची १५  क्विंटल आवक होऊन २००० ते ३०००, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. दर २००० ते ३०००, तर सरासरी २५०० रुपये मिळाले. वालाची ५ क्विंटल आवक होऊन १५०० ते २५०० तर सरासरी २००० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक होऊन ४०० ते ७००, तर सरासरी ५५० रुपये दर मिळाले. शेपूची ४० क्विंटल आवक होऊन ४०० ते ६००, सरासरी ५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन १००० ते  १५००, सरासरी १२५० रुपये दर मिळाले. मेथीच्या ४०  हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा १५० ते २५० तर सरासरी २०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची २०० क्विंटल आवक होऊन ५०० ते ८००, तर सरासरी ६५० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन २००० ते ३०००, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक होऊन १२०० ते २०००, तर सरासरी १६०० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक होऊन ८०० ते १२००, सरासरी १००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची २००० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ३०० ते ५००, सरासरी ४०० रुपये मिळाले.

हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक होऊन १५०० ते २५००, सरासरी २००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन १२०० ते १५००, सरासरी १३५० रुपये दर मिळाले. 

भेंडीला सरासरी १६०० रुपये

भेंडीची २० क्विंटल आवक होऊन १२०० ते २००० रुपये, तर सरासरी १६०० रुपये दर मिळाले. कोबीची ४० क्विंटल आवक होऊन १००० ते १५००, सरासरी १२५० रुपये दर मिळाले. लिंबांची ३५ क्विंटल आवक होऊन ५०० ते १०००, सरासरी ७५० रुपये दर मिळाले. पेरुची ४० क्विंटल आवक होऊन ६०० ते १०००, सरासरी ८०० रुपये दर मिळाले. पपईची ७० क्विंटल आवक होऊन ५०० ते १०००, सरासरी ७५० रुपये दर मिळाले.


इतर बाजारभाव बातम्या
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ५०००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नागपुरात संत्रा, मोसंबीचे दर ‘जैसे थे’नागपूर : मागणीअभावी  संत्रा दरात घसरण झाली...
नगरला वाल, घेवड्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात हिरव्या मिरचीच्या दरात वाढ पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळीदरात किंचित सुधारणाजळगाव ः खानदेशात दर्जेदार केळीचा तुटवडा असतानाच...
नाशिक जिल्ह्यात कांदा दरात सुधारणानाशिक : कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे...