Agriculture news in Marathi, Carrots price improvement at pune | Agrowon

गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २०) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. दोन दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे ग्राहक नसल्याने शेतमाल मागणी अभावी पडून होता. तर पालेभाज्यांमध्ये भिजलेल्या पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने चांगल्या पालेभाज्यांचे दर तेजीत होती. तर भिजलेल्या फुलांची आवक झाल्याने आणि ग्राहक नसल्याने दर स्थिर होते. तर गाजर आणि पावट्याचे दर वाढले होते.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २०) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. दोन दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे ग्राहक नसल्याने शेतमाल मागणी अभावी पडून होता. तर पालेभाज्यांमध्ये भिजलेल्या पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने चांगल्या पालेभाज्यांचे दर तेजीत होती. तर भिजलेल्या फुलांची आवक झाल्याने आणि ग्राहक नसल्याने दर स्थिर होते. तर गाजर आणि पावट्याचे दर वाढले होते.

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे २ टेम्पो, कर्नाटकातून श्रावणी घेवडा आणि पावटा प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० गोणी, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, कोबी १० टेम्पो, फ्लॉवर १५, सिमला मिरची आणि भेंडी प्रत्येकी सुमारे १२ टेम्पो, गवार सुमारे ५ टेम्पो, काकडी १५ टेम्पो, हिरवी मिरची ३ टेम्पो, गाजर एक हजार गोणी तसेच कांदा सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : २६०-३२०, बटाटा : १२०-१८०, लसूण : १०००-१८००, आले : सातारी ५००-६५०, भेंडी : १५०-२५०, गवार : ४००-५००, टोमॅटो : २००-३००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी २५०-३००, पापडी : २५०-३००, पडवळ : २५०-२६०, फ्लॉवर : ८०-१४०, कोबी : १००-१६०, वांगी : ३००-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : २५०-३५०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १२०-१४०, शेवगा : ५००-६००, गाजर : ४००-६००, वालवर : २५०-३००, बीट : १५०-१६०, घेवडा : ३५०-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, पावटा : ४००-६००, भुईमूग शेंग : ४५०- ५००, मटार : ६००-१०००, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २४०-,२५० मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

फुलबाजार 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-६०, गुलछडी -५-१०,  बिजली : १०-३०, कापरी : २०-४०, शेवंती : ३०-८०, अ‍ॅस्टर : १०-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-८०, लिली बंडल : ४-५, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : ३०-६०. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १५०० -३५००, मेथी : २०००-२८००, शेपू : १५००-२०००, कांदापात : १५०० -२०००, चाकवत : ७०० -८००, करडई : ७०० -८००, पुदिना : ४०० -४५०, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १५००-२०००, राजगिरा : ८०० -१०००, चुका : १०००-१२००, चवळई : १००० -१२००, पालक : १००० -१५००.

फळबाजार 
रविवारी (ता. २०) येथील फळ विभागात मोसंबी सुमारे ५० टन, संत्री ८ टन, डाळिंब २०० टन, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज १० टेम्पो, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे दोन हजार गोणी, पेरू १०० क्रेटस, चिक्कू एक हजार डाग, तर सीताफळाची १० टन आवक झाली होती.  फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-४००, मोसंबी : (३ डझन) : १७०-३५०, (४ डझन ) : ८०-१८०, संत्रा : (३ डझन) : १२०-२२०, (४ डझन ) : ६०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१५०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-२०, पपई : १०-३०, चिक्कू : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सीताफळ : २०-१००, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) २०००-२५००, किन्नोर : (२५-३० किलो) २२००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) १०००-१४००, अमेरिकन (१५ किलो) १०००-१४००.

मासळी बाजार 
गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २०) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ६ टन, खाडीची सुमारे ४०० किलो तर नदीच्या मासळीची १ टन आवक झाली होती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ८ टन आवक झाली होती. खोल समुद्रातील मासळीला मागणी वाढल्याने हलवा, पापलेट, सुरमईच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. इतर मासळीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती ठाकुर परदेशी यांनी दिली. तर मागणी वाढल्याने चिकन दर १० रुपये आणि मटणाच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे होती.

खोल समुद्रातील मासळी 
पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १४००, मध्यम : ८००-९००, लहान ६००-६५०, भिला : ४८०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : ४८०-५२०, घोळ : ५२०, भिंग : ३२०, करली : २८०-३२०, करंदी : ३६०, पाला :  लहान -७००-८००,  मोठे - ११००-१२००, वाम : लहान  पिवळी ४८०-५२० , मोठे  ६००-७००,  काळी : ४००, ओले बोंबील : 
८०-१६०, 

कोळंबी 
लहान  २०० मोठे  ४८०, जंबोप्रॉन्स : १३००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १३००, मोरी : २८०, मांदेली : १४०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०-५२०. 

खाडीची मासळी 
सौंदाळे : २००, खापी : १६०, नगली : ३६०, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा :  लहान १४० , मोठे  २४०, शेवटे : २४०, बांगडा : लहान  १४०-१६० ,मोठे  २००-२८०, पेडवी : ८०, बेळुंजी : १००-१४०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १४०. 

नदीची मासळी 
रहू : १४०, कतला : १४०, मरळ :२८०, शिवडा : २००, चिलापी : ६०, खवली : १८०, आम्ळी : १००-१२०, खेकडे : २०० वाम : ५२०. 

मटण 
बोकडाचे : ५२०, बोल्हाईचे : ५२०, खिमा : ५२०, कलेजी : ५८०. 

चिकन 
चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ७२० डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४१० डझन : ६० प्रतिनग : ५.
 

इतर बाजारभाव बातम्या
दौंड बाजार समितीत ज्वारीला ४३०० रुपये दरदौंड, जि. पुणे : दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३२५० ते ६२५०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
सोलापुरात टोमॅटो, वांग्याच्या दरात तेजीसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
गुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६१४ क्विंटल...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
औरंगाबादेत फ्लॉवर १४०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भुईमूग शेंग ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा ५०० ते ६००० रूपये...सोलापुरात सर्वाधिक ६००० रुपये सोलापूर...
नाशिकमध्ये वांगी २५०० ते ४००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
साताऱ्यात कोथिंबिरीस प्रतिशेकडा २००० ते...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या भावात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
सीताफळ, मोसंबी, संत्रा, डाळिंबाचे दर...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात कांदा, शेवग्यासह पालेभाज्यांचे...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सांगलीत गूळ ३२०० ते ४३३० रुपये...सांगली : येथील बाजार समितीच्या आवारात गुळाची ३०५६...
परभणीत मेथीची पेंडी ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सीताफळ ५०० ते ४००० रुपये...पुण्यात सीताफळ ५ ते १२० रुपये प्रतिकिलो पुणे...
सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...