Agriculture news in Marathi, carrots rate hike | Agrowon

गुलटेकडीत कोबी, शेवगा, गाजराच्या दरात वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जुलै 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे १४० ट्रक आवक झाली होती. फ्लॉवर, कोबी, शेवगा, गाजर, बीट, भुईमूग शेंग, तोतापुरी कैरीच्या आवकेत घट झाल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे १४० ट्रक आवक झाली होती. फ्लॉवर, कोबी, शेवगा, गाजर, बीट, भुईमूग शेंग, तोतापुरी कैरीच्या आवकेत घट झाल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते. 

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १२ टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशातून सुमारे ४ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबी, कर्नाटक मधून तोतापुरी कैरी सुमारे ३ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे २ टेम्पो, इंदौर येथून गाजर सुमारे ४ टेम्पो, कर्नाटकमधून घेवडा सुमारे ३ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटो सुमारे ४ हजार क्रेट, फ्लॉवर, कोबी प्रत्येकी सुमारे ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची सुमारे ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, गावरान कैरी सुमारे ६ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे  ७० गोणी, तसेच कांदा सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा - १३०-१५०, बटाटा- ९०-१५०, लसूण - ४००-८००, आले : सातारी ८००-९००, भेंडी : २००-३००, गवार : २००-३००, टोमॅटो - १००-१२०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ४००-५००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १५०-१६०, काकडी : १४०-१६०, कारली : हिरवी ४००-४२०, पांढरी ३००-३२०, पापडी : ५००, पडवळ : २८०-३००, फ्लॉवर : १८०-२२०, कोबी : १५०-२००, वांगी : २०० -२५०, डिंगरी : १८० -२००, नवलकोल : १४० -१५०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ४५०- ५००, गाजर : २००-२२० वालवर : ३००-३५०, बीट : १५०-२००, घेवडा : ५५०-६००, कोहळा : १०० -१५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १५० -२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ४०० -५००, पावटा : ७००, मटार : ६५०-८००, तांबडा भोपळा ८०-१२०, चिंच अखंड ३५०, सुरण : २५०-२८०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाजी
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे अवघी सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली होती. 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००० -१८००, मेथी : १०००-१५००, शेपू : ५००-१०००, कांदापात : १२०० -१५००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ५०० -६००, पुदिना : ३०० -५००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५०० -६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४०० -६००, पालक : ५०० -७००. 

फळबाजार
रविवारी (ता. ३०) मोसंबी सुमारे ३० टन, संत्री २ टन, डाळिंब २०० टन, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे दोन हजार गोणी, चिक्कू चारशे हजार डाग, कलिंगड ५ टेम्पो, खरबुज ५ टेम्पो, पेरूची सुमारे ५० क्रेट आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २५०-५००, मोसंबी : ( ३डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ८०-१६०, संत्रा : (३ डझन) : २००-५००, (डझन ४) : १२०-२००, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : २०-८० गणेश १०-३०, आरक्ता १०-२०. कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-२०, पपई : ५-१५, चिक्कू : १००-७००,  पेरु (२० किलो) ४००-८००.

फुलबाजार
फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-८०, गुलछडी : ८-२०, बिजली - १००-१५०, कापरी : ७०-११०, मोगरा : १००-२००, शेवंती - ६०-१२०, आॅस्टर : १६-२५, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिलि बंडल : २-३ जर्बेरा : १०-४०, कार्नेशियन : १००-१५०.

मटण-मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ३०) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ६ टन, खाडीची ५०  ते १०० किलो आणि नदीची सुमारे ४०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ८ टन आवक झाल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान, पश्चिम किनारपट्टीवरून पावसामुळे मासळीची आवक बंद झाली आहे. बाजारात पश्चिम बंगाल, कन्याकुमारीहून मासळीची आवक सुरू आहे. तसेच मागणी कमी असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत बांगडा, पापलेटच्या दरात घट झाली असून, वामच्या दरात वाढ झाली आहे. नारळी पौर्णिमेनंतर पश्चिम किनाऱ्यावरून आवक सुरू होईल, अशी माहितीदेखील परदेशी यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) ः पापलेट : कापरी : १५००-,१६००, मोठे १४००-१५००, मध्यम : १०००, लहान ७००-८००, भिला : ५००-७००, हलवा : ७००, सुरमई : ६००-८००, रावस : लहान ८००-९००, मोठा : १०००, घोळ : ६००-७००, भिंग : ४००, करली ३६० करंदी ००, पाला : लहान ०००, मोठा ०००-०००, वाम : पिवळीलहान ५०० मोठी ९००  काळी : ४८०, ओले बोंबील :३२०, कोळंबी ः लहान २८०, मोठी :  ४८० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २४०, मोठी- ४४०, मांदेली : १४०, राणीमासा : २००, खेकडे : ३२०, चिंबोऱ्या : ५५०.

खाडीची मासळी
सौंदाळे : २८०, खापी ०००, नगली : लहान : ४४०-४८० मोठी ६००-७००, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : लहान २४० मोठे ३२०, शेवटे : ००. ४०० बांगडा : लहान १६०, मोठा १६०-२००, पेडवी : ०००, बेळुंजी : १८०-, तिसऱ्या : २००, खुबे १२०-१४०, तारली : १२०-१४०.

नदीची मासळी
रहू :१४० -१६०, कतला : १६०, मरळ : लहान २८०-३२० मोठे- ४८०, शिवडा : २००-२४०, चिलापी : ६०-८०,  खवली : २००, आम्ळी: १२० खेकडे : २८ ४०, वाम : ४८०.

मटण : बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा: ५००, कलेजी : ५८०.

चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २७०. 

अंडी ः गावरान : शेकडा : ७२०, डझन : ९६ प्रति नग : ८ इंग्लिश : शेकडा : ४६५ डझन: ६६ प्रतिनग : ५.


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...