agriculture news in marathi, case filed on Bank Manager regarding farmers suicide | Agrowon

शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाच्या तक्रारीवरून बॅंक व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती शासनाच्या आदेशावरून दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यामुळे खळबळ उडाली आहे.

हिंगणघाट तालुक्‍यातील वडनेर येथील शेतकरी गणपत भोर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असतानाही लाभ न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. 

वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाच्या तक्रारीवरून बॅंक व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती शासनाच्या आदेशावरून दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यामुळे खळबळ उडाली आहे.

हिंगणघाट तालुक्‍यातील वडनेर येथील शेतकरी गणपत भोर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असतानाही लाभ न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. 

या प्रकरणी मंत्रालयातून चौकशीचे ओदश आल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्यावर बॅंक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपयांचे, ग्रामशक्‍ती या फायनान्स कंपनीचे तीन लाख रुपये तसेच इतरांचे दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या भावांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. परंतू त्यांना मात्र डावलण्यात आले. कर्जमाफीच्या लाभासाठी त्यांनी जिल्ह्याची लीड बॅंक असलेल्या बॅंक ऑफ इंडियाचे उंबरठे झिजविले. परंतू कर्जमाफी मिळण्याची चिन्हे नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. 

उपविभागीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करीत तसा अहवाल दिला. त्यांच्याच तक्रारीवरून बॅंक व्यवस्थापक गौतम जांभुळे यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्यात आला. राज्यातील अशा प्रकारच्या पहिल्याच घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...