पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीस In the case of peak loans Notice to 16 banks
पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीस In the case of peak loans Notice to 16 banks

वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीस

पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील बॅंकांनी उदासीनतेचे धोरण अवलंबिले आहे. त्याच्या परिणामी खरीप संपल्यानंतरही कर्ज उद्दिष्टाचा टप्पा गाठता आला नाही.

वर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील बॅंकांनी उदासीनतेचे धोरण अवलंबिले आहे. त्याच्या परिणामी खरीप संपल्यानंतरही कर्ज उद्दिष्टाचा टप्पा गाठता आला नाही. याची गंभीर दखल घेत  जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर अग्रणी बॅंक व्यवस्थापनाकडून सुमारे १६ बॅंकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.  दर वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य बॅंकांना दिले जाते. परंतु बॅंकांकडून उद्दिष्टानुसार पीककर्ज वितरण होत नाही. दर वर्षी अशा बॅंकांवर कारवाईचा इशारा देखील दिला जातो. परंतु कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. यंदाच्या खरिपात वर्धा जिल्ह्यात ८५० कोटींची रक्‍कम पीककर्ज म्हणून वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु आतापर्यंत २२ बॅंकांपैकी केवळ बॅंक ऑफ इंडिया आणि आरआरबी-व्हीकेजीबी या दोन बॅंकांनीच ५० टक्यांवर पीककर्ज वितरण केले आहे. उर्वरित बॅंकांची कर्ज वितरणाची गती मंद असल्याने या बॅंकांवर कायदेशीर कार्यवाही करीत त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर अग्रणी बॅंक व्यवस्थापनाने पीककर्ज वाटपात हयगय करणाऱ्या १६ बॅंकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचा खुलासा मिळताच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही केली जाणार आहे. 

बँक शाखांची स्थिती एकूण बॅंक शाखा    १४१  खासगी बॅंका    २६  शासकीय बॅंका    ११५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com