Agriculture news in marathi In the case of peak loans Notice to 16 banks | Agrowon

वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील बॅंकांनी उदासीनतेचे धोरण अवलंबिले आहे. त्याच्या परिणामी खरीप संपल्यानंतरही कर्ज उद्दिष्टाचा टप्पा गाठता आला नाही.

वर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील बॅंकांनी उदासीनतेचे धोरण अवलंबिले आहे. त्याच्या परिणामी खरीप संपल्यानंतरही कर्ज उद्दिष्टाचा टप्पा गाठता आला नाही. याची गंभीर दखल घेत  जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर अग्रणी बॅंक व्यवस्थापनाकडून सुमारे १६ बॅंकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. 

दर वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य बॅंकांना दिले जाते. परंतु बॅंकांकडून उद्दिष्टानुसार पीककर्ज वितरण होत नाही. दर वर्षी अशा बॅंकांवर कारवाईचा इशारा देखील दिला जातो. परंतु कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही.

यंदाच्या खरिपात वर्धा जिल्ह्यात ८५० कोटींची रक्‍कम पीककर्ज म्हणून वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु आतापर्यंत २२ बॅंकांपैकी केवळ बॅंक ऑफ इंडिया आणि आरआरबी-व्हीकेजीबी या दोन बॅंकांनीच ५० टक्यांवर पीककर्ज वितरण केले आहे. उर्वरित बॅंकांची कर्ज वितरणाची गती मंद असल्याने या बॅंकांवर कायदेशीर कार्यवाही करीत त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर अग्रणी बॅंक व्यवस्थापनाने पीककर्ज वाटपात हयगय करणाऱ्या १६ बॅंकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचा खुलासा मिळताच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही केली जाणार आहे. 

बँक शाखांची स्थिती
एकूण बॅंक शाखा    १४१ 
खासगी बॅंका    २६ 
शासकीय बॅंका    ११५


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...