agriculture news in Marathi, cases on 36 officers in irrigation fraud, Maharashtra | Agrowon

विदर्भातील सिंचन घोटाळ्यात ३६ अधिकाऱ्यांविरोधात खटले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

नागपूर ः सिंचन घोटाळ्यामध्ये गेल्या तीन वर्षांत २० प्रकरणांत एकूण ३६ अधिकाऱ्यांविरोधात सत्र न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून, चार अधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्याची परवानगी मागणारे प्रस्ताव सरकारकडे प्रलंबीत आहेत, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सरकारने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. 

नागपूर ः सिंचन घोटाळ्यामध्ये गेल्या तीन वर्षांत २० प्रकरणांत एकूण ३६ अधिकाऱ्यांविरोधात सत्र न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून, चार अधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्याची परवानगी मागणारे प्रस्ताव सरकारकडे प्रलंबीत आहेत, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सरकारने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. 

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी नागपूर खंडपीठात हे प्रतिज्ञापत्र सादर केले. वडनेरे समितीच्या अहवालानुसार, ७७ आरोपी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी सुरू करण्यात आली. त्यात सचिव श्रेणीतील १, मुख्य अभियंता श्रेणीतील आठ, अधीक्षक अभियंता श्रेणीतील १४ तर कार्यकारी अभियंता व त्याखालील श्रेणीतील ५४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास अधिकाऱ्याने यापैकी काही प्रकरणात अंतिम अहवाल सादर केला आहे.

वडनेरे समितीचा व डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाचा अहवाल लक्षात घेता ३० ऑगस्ट २०१६ रोजी राज्य विधिमंडळाने सात हजार ३३५ कोटी रुपयांच्या ९४ सिंचन प्रकल्पाची कंत्राटे रद्द केली. या कंत्राटांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. 

सरकारने गोसीखुर्द प्रकल्पाशी संबंधित ३७ कामांचे व जिगाव प्रकल्पाशी संबंधित सात कामांचे टेक्‍निकल ऑडिट सुरू केले आहे. सरकारच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले ११८ प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्यात आले. त्यामुळे २.५ हेक्‍टर सिंचनाखाली आले. येत्या तीन वर्षांत आणखी ९८ प्रकल्प पूर्ण केले जातील, अशी माहिती देखील प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे.


इतर बातम्या
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...