आणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयात खटला

या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता केलेल्या दाव्यापेक्षा कमी निघाल्याने जिल्हा परिषद कृषी विभागाने आणखी तीन बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन खटला दाखल केला आहे.
soybean
soybean

अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता केलेल्या दाव्यापेक्षा कमी निघाल्याने जिल्हा परिषद कृषी विभागाने आणखी तीन बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन खटला दाखल केला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण पाच कंपन्यांविरुद्ध अशा प्रकारचा खटला दाखल करण्यात आलेला आहे. या हंगामासाठी बाजारात विक्रीला आणलेल्या बियाण्याचे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकाने नमुने काढले होते. हे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी काही कंपन्यांचे नमुने अप्रमाणित आल्याने कृषी खात्याने न्यायालयीन कारवाई सुरु केली आहे.गेल्या आठवड्यात मूर्तीजापूर तालुका न्यायालयात दोन बियाणे कंपन्यांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला असून आता बार्शीटाकळी न्यायालयात तीन कंपन्यांविरुद्ध अशा प्रकारचा खटला दाखल केल्या गेला आहे. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता १० टक्क्यांच्याही आत आल्याने या कंपन्यांकडून खुलासा मागविण्यात आला होता. खुलासा समाधानकारक नसल्याने प्रशासनाने न्यायालयात खटला दाखल केला. कृषी विभागाच्या पथकाने बार्शीटाकळी तालुक्यात घेतलेले नमुने अप्रमाणित निघाल्याने त्याच तालुक्याच्या न्यायालयात खटला भरण्यात आला आहे. येत्या काळात आणखी काही कंपन्यांच्या बियाण्याबाबत न्यायालयीन खटला दाखल करणार आहोत, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com