agriculture news in Marathi, Cases on three persons due to humble water dam, Maharashtra | Agrowon

निकृष्ट बंधाऱ्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

गडचिरोली ः चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले दोन सिमेंट बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेले. याप्रकरणी वाच्यता झाल्यानंतर चौकशीअंती मृदसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंत्यांसह तिघांविरोधात बेडगाव पोलिस मदत केंद्रात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गडचिरोली ः चार महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेले दोन सिमेंट बंधारे पहिल्याच पावसात वाहून गेले. याप्रकरणी वाच्यता झाल्यानंतर चौकशीअंती मृदसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंत्यांसह तिघांविरोधात बेडगाव पोलिस मदत केंद्रात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जलयुक्‍त शिवार योजनेची कामे करण्यात आली. कोरची तालुक्‍यातील बोरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हुडुकदुमा येथे दोन बंधारे मंजूर करण्यात आले. त्यासाठी शासनाने २१ लाख ४५ हजार ६७४ रुपयांची तरतूद केली. मात्र, कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले. याकडे मृद व जलसंधारण खात्याच्या अभियंता व अधिकाऱ्यांनी ही दुर्लक्ष केले. त्यामुळे हे बंधारे पहिल्याच पाण्यात वाहून गेले.

याप्रकरणाची वाच्यता झाली त्यासोबतच सोशल मीडियावर देखील यावर चर्चा होऊ लागली. त्याची दखल घेत रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीने प्रत्यक्ष बंधाऱ्यावर जाऊन माहिती घेतली असता काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आले. 

जलयुक्‍त शिवार अभियान समितीचे अध्यक्ष समाधान शेंडगे यांनी कोरची नायब तहसीलदार रेखा बोके यांना प्राधिकृत करून बेडगाव पोलिस मदत केंद्रात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिस मदत केंद्रात उपविभागीय अभियंता वाय. जी. बरडे, कनिष्ठ अभियंता एम. टी. पेंदाम, कंत्राटदार शताब कुरेशी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

कोरचीचे प्रभारी पोलिस अधिकारी विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नीतेश पोटे याप्रकरणाचा तपास करीत आहेत. जलयुक्‍त शिवार अभियानातून जंगली भागात १६ पेक्षा अधिक बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यांची दखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या पार्श्‍वभूमीवर होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...