agriculture news in Marathi cash reimbursement who denied seed Maharashtra | Agrowon

बियाणे न स्वीकारणाऱ्यांना ‘महाबीज'कडून रोख मोबदला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

या हंगामात ‘महाबीज’ने विक्री केलेले सोयाबीन बियाणे विविध कारणांमुळे उगवले नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार ‘महाबीज’ यंत्रणेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे धोरण जाहीर केले.

अकोला ः  या हंगामात ‘महाबीज’ने विक्री केलेले सोयाबीन बियाणे विविध कारणांमुळे उगवले नसल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार ‘महाबीज’ यंत्रणेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे धोरण जाहीर केले. ज्या शेतकऱ्यांनी बियाणे घेण्यास नकार दिला त्यांना बियाण्याची किंमत दिली जात आहे. आतापर्यंत १९ लाख १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात आल्याची माहिती महाबीज प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या खरीप हंगामात राज्यभरातील शेतकऱ्यांनी ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्यास मोठ्या प्रमाणावर पसंती दिली होती. परंतु काही ठिकाणी हे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी झाल्या. पडताळणी केल्यानंतर ‘महाबीज’कडून अशा शेतकऱ्यांना ३२५० क्विंटल १० किलो बियाणे पुन्हा पेरणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. यापैकी आजपर्यंत ६१० शेतकऱ्यांनी ५८ लाख लाख रुपयांचे ७७९ क्विंटल ९० किलो बियाण्याची उचल केली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी बियाणे घेण्यास नकार दिला, अशा शेतकऱ्यांना तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल तसेच बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याची माहिती घेवून, बियाणे किमतीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

आजपर्यंत १९ लाख १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहितीही महाबीज प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


इतर अॅग्रो विशेष
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...