agriculture news in Marathi, cashaw producers loss by 500 crore rupees, Maharashtra | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात काजू उत्पादकांना यंदा ५०० कोटींचा फटका
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 जून 2019

रत्नागिरी ः बदलत्या वातावरणाचा फटका या वर्षी कोकणातील काजू उत्पादकांना बसला आहे. या वर्षी केवळ ३० टक्केच उत्पादन हाती मिळाले. त्यामुळे उत्पादकांना सुमारे ५०० कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही परिस्थिती सलग दुसऱ्या वर्षीही निर्माण झाली आहे.

रत्नागिरी ः बदलत्या वातावरणाचा फटका या वर्षी कोकणातील काजू उत्पादकांना बसला आहे. या वर्षी केवळ ३० टक्केच उत्पादन हाती मिळाले. त्यामुळे उत्पादकांना सुमारे ५०० कोटींचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही परिस्थिती सलग दुसऱ्या वर्षीही निर्माण झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील तीस वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात काजू व आंबा लागवड झाली. मात्र बदलत्या वातावरणाचा पिकावर परिणाम होत आहे. यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या मोहर येण्याच्या पहिल्या टप्प्यात अवकाळी पावसामुळे परिणाम झाला. त्यानंतर जानेवारीमध्ये या पिकाला थंडी आवश्यक असताना प्रत्यक्षात तापमानात वाढ झाली. फेब्रुवारी-मार्चमध्ये ढगाळ वातावरण तसेच थंड वातावरण यामुळे काजू पिकावर बुरशीजन्य रोगाचाही प्रादूर्भाव झाला. या वर्षी काजूला लांब मोहर आला. याचाच अर्थ या वर्षी नर मोहराचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे फळधारणा कमी झाली. नुकत्याच झालेल्या ‘फणी’ वादळाचाही परिणाम या पिकावर झाला आहे. 

उत्पादन कमी होऊनही दर ११६ रुपयांभोवती
गतवर्षी काजू बीला १५० ते १७० रुपये एवढा दर होता. मात्र या वर्षी उत्पन्न कमी असूनही यंदा काजू बीचा दर ११६ रुपयांभोवतीच फिरत राहिला. उत्पन्न कमी व दरही कमी त्यामुळे काजू उत्पादकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात काजू प्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लहान-मोठे २०० ते ३०० प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. गतवर्षी काजू बी ७० टक्के उत्पादित झाली होती. जिल्ह्यात गतवर्षी ८० टक्के काजू बी स्थानिक पातळीवर, तर २० टक्के काजू बी परदेशातून मागवण्यात आली होती. मात्र त्यातून फारसा फायदा न झाल्याने काजू प्रक्रिया उद्योगाचेही कंबरडे मोडले. सलग दुसऱ्या वर्षी काजू उत्पादन कमी झाल्याने त्याचा फटका उत्पादकांना बसला आहे.

आर्थिक मदत द्या
जिल्ह्यात काजू लागवडीखालील क्षेत्र १ लाख २७ हजार हेक्टर आहे. कोकणात मजुरांचा प्रश्‍न असल्याने आंब्याऐवजी काजूला पसंती मिळत आहे. मात्र नैसर्गिक वातावरणाचा एवढा गंभीर परिणाम या पिकावरही होऊ शकतो हे गेली दोन वर्षे काजू उत्पादक अनुभवत आहेत. दुष्काळ जाहीर करून शासनाने उत्पादकांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरीतील काजू उत्पादक विवेक बारगिर यांनी सांगितले.
 

इतर अॅग्रो विशेष
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...