रत्नागिरीतील चारच मंडळात काजू पिकाचा विमा परतावा

रत्नागिरी : यंदा जिल्ह्यातील ६५ महसूली मंडळापैकी चार मंडळांतील ३७१ शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झाला.
Cashew crop insurance should be refunded in all the four circles in Ratnagiri
Cashew crop insurance should be refunded in all the four circles in Ratnagiri

रत्नागिरी : हवामानाच्या बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी उध्वस्त होऊ नये, यासाठी पीक विमा योजनेत काजू फळपिकाचा समावेश केला आहे; मात्र यंदा जिल्ह्यातील ६५ महसूली मंडळापैकी चार मंडळांतील ३७१ शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झाला. या चार मंडळातील ट्रीगर कार्यरत झाला आहे.

कोकणात आंबा, काजूची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. गेल्या दहा वर्षांत हवामान बदलाचे दुरगामी परिणाम दोन्हीच्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी शासनाने सहा वर्षांपूर्वी पीक विमा योजनेत आंबा, काजूचा समावेश केला होता. कोरोनामुळे काजूच्या हंगामावर काजू शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

काजू ‘बी’ला म्हणावा तसा दर न मिळाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. उत्पादनही ५० टक्केच आले आहे. विमा परतावा योग्य पध्दतीने मिळत नसल्याने आधीच शेतकरी विमा उतरवण्याकडे दुर्लक्ष करतात. डिसेंबर २०१९ ते मे २०२० या हंगामात २,७४० शेतकऱ्यांनी २,२६० हेक्टरवर विमा उतरवला होता. त्यातील ३७१ शेतकऱ्यांना विमा परताव्यापोटी ३८ लाख ३२ हजार २७६ रुपये मिळाले आहेत. ही रक्कम ६५ पैकी अवघ्या ४ महसूली मंडळांतील शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे.

हवामानातील बदल टिपण्यासाठी प्रत्येक महसूली मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आली आहेत. त्यातील चारच मंडळातील ट्रीगर कार्यरत झाले आहेत. उर्वरित मंडळात कमी-अधिक तापमान, पाऊस याची नोंद झालेली नाही.

या मंडळांत मिळाला विमा

विमा परतावा मंजूर झालेल्या मंडळात गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळेतील ४७ शेतकऱ्यांना ४ लाख ८ हजार १७० रुपये, लांजा तालुक्यातील भांबेड मंडळातील २७ शेतकऱ्यांना ४,०५,७९०, संगमेश्‍वर तालुक्यातील देवळे येथील १९१ शेतकऱ्यांना २४,५४,७३२ रुपये, तर मुरडवमधील १०६ शेतकऱ्यांना ५ लाख ६३ हजार ५८४ रुपये परतावा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com