साताऱ्यात होणार काजू, सीताफळ लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : कोरडवाहू शेतकऱ्यांना हमखास व शाश्वत उत्पन्नाची हमी मिळू शकेल, अशी सीताफळ लागवड, तसेच उत्पन्न मिळवू देणारी काजू लागवड तब्बल दीड हजार हेक्‍टर क्षेत्रावर करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यातून शेतकरी इतर फळ लागवडीकडे वळून त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासही वाव मिळणार आहे. 

सीताफळाच्या लागवडीनंतर दोनच वर्षांत उत्पादन सुरू होते, हे कोरडवाहू फळझाड असले, तरी थोड्याशा पाण्यानेही उत्पादनात दुपटीने वाढ होते, सध्या सीताफळांना चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना हमखास व शाश्वत उत्पन्नाची हमी मिळू शकेल. सीताफळ लागवडीसाठी इतर कोणत्याही फळपिकाच्या तुलनेत कमी खर्च येतो. वर्षातून दोन वेळेस खते, फवारणीचा खर्च नाही आणि शेळ्या व जनावरे खात नसल्याने संरक्षण व देखभालीचाही खर्च नाही. फळे निघेपर्यंत आंतरपीक घेता येते. सीताफळ हे कोरडवाहू व हलक्‍या जमिनीत येणारे आहे.

कोरेगाव, माण, फलटण, खंडाळा, खटाव तालुक्‍यात सीताफळ मोठ्या प्रमाणात घेता येईल. वर्षभरात कोणतेच पीक घेतले जात नाही. या जमिनीचा योग्य वापर झाल्यास जमिनीची धूप थांबेल, शिवाय, सीताफळाच्या लागवडीतून शेतकऱ्यांची आर्थिक बाजू भक्कम होईल, तसेच काजू लागवडीसाठी पाटण, कऱ्हाड, वाई, जावळी, महाबळेश्‍वर या पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या तालुक्‍यांची निवड केली आहे.

काजूला बाजारपेठेत चांगली मागणी असून, ते साठवून ठेवता येते, तसेच त्यावर प्रक्रिया करूनही शेतकरी लाभ घेऊ शकतो. या दोन्ही पिकांसाठी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना, तसेच रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती कृषी अधीक्षक सुनील बोरकर यांनी दिली.    सीताफळ लागवड  

  • कोरेगाव : ३०० हेक्‍टर 
  • माण : २०० हेक्‍टर 
  • फलटण : २०० हेक्‍टर 
  • खटाव : १५० हेक्‍टर 
  • खंडाळा : १५० हेक्‍टर 
  • काजू लागवड 

  •  पाटण : ३०० हेक्‍टर 
  • कऱ्हाड : ५० हेक्‍टर 
  • वाई : ५० हेक्‍टर 
  • जावळी : ५० हेक्‍टर 
  • महाबळेश्‍वर : ५० हेक्‍टर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com