फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू धोक्यात

गेली पंधरा वर्षे काजू पिकातून उत्पन्न घेत आहे. परंतु, या वर्षी काजू बागेची दुरवस्था झाली. या वर्षी दहा टक्केही उत्पादन मिळणार नाही. - सुशांत नाईक,काजू बागायतदार, वेंगुर्ला वातावरणाचा मोठा परिणाम या वर्षी काजू बागेवर होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी बागांचे निरीक्षण करून उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. पालवी, मोहर आणि काजू पक्व होण्याची स्थिती एकाच वेळी असेल, तर कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात. - विवेकानंद नाईक,कृषी सहायक, वैभववाडी
Cashew nuts are threatened by the Cauliflower
Cashew nuts are threatened by the Cauliflower

सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे हैराण झालेले काजू बागायतदार आता फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे मेटाकुटीस आले आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे काजू पिकांवरील फुलकिड्यांना आळा घालण्यात बागायतदारांना अपयश येत आहे. त्यामुळे काजू उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी, त्यानंतर लांबलेला पाऊस आणि क्यार वादळ आदीचा दुष्परिणाम काजू बांगावर झाला. काजूला ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर यासारख्या विविध कीड रोगांनी ग्रासले. कित्येक शेतकऱ्यांच्या काजू बागांची पाने वाळून गेली. काहींच्या बागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या. त्यातूनही काही शेतकऱ्यांनी जिवाचे रान करीत सातत्याने कीटकनाशकांच्या फवारण्या करून बागा वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना यश आले. परंतु, लांबलेल्या थंडीमुळे काजूंना ऑक्टोबर महिन्यात येणारी पालवी नोव्हेंबर संपला तरी आली नाही.

डिसेंबरपासून काजूंना चांगली पालवी आली. अनेक काजू बागांना मोहोरदेखील आला. मात्र त्यानंतर सातत्याने जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची मालिका सुरू झाली. दर चार पाच दिवसांच्या फरकाने जिल्ह्यातील वातावरणात बदल दिसून येत आहे. 

फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. काजूचा मोहोर काळवंडला असून तयार होत असलेला काजू काळा पडू लागला आहे. सातत्याने फवारण्या न परवडणाऱ्या असल्यामुळे या रोगामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात ६७ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड आहे. यातील सुमारे ४९ हजारपेक्षा अधिक क्षेत्र उत्पादनक्षम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com