Agriculture news in marathi Cashew nuts are threatened by the Cauliflower | Agrowon

फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू धोक्यात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

गेली पंधरा वर्षे काजू पिकातून उत्पन्न घेत आहे. परंतु, या वर्षी काजू बागेची दुरवस्था झाली. या वर्षी दहा टक्केही उत्पादन मिळणार नाही.
- सुशांत नाईक, काजू बागायतदार, वेंगुर्ला

वातावरणाचा मोठा परिणाम या वर्षी काजू बागेवर होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी बागांचे निरीक्षण करून उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. पालवी, मोहर आणि काजू पक्व होण्याची स्थिती एकाच वेळी असेल, तर कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात.
- विवेकानंद नाईक, कृषी सहायक, वैभववाडी 

सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे हैराण झालेले काजू बागायतदार आता फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे मेटाकुटीस आले आहेत. सततच्या ढगाळ वातावरणामुळे काजू पिकांवरील फुलकिड्यांना आळा घालण्यात बागायतदारांना अपयश येत आहे. त्यामुळे काजू उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी, त्यानंतर लांबलेला पाऊस आणि क्यार वादळ आदीचा दुष्परिणाम काजू बांगावर झाला. काजूला ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर यासारख्या विविध कीड रोगांनी ग्रासले. कित्येक शेतकऱ्यांच्या काजू बागांची पाने वाळून गेली. काहींच्या बागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या. त्यातूनही काही शेतकऱ्यांनी जिवाचे रान करीत सातत्याने कीटकनाशकांच्या फवारण्या करून बागा वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना यश आले. परंतु, लांबलेल्या थंडीमुळे काजूंना ऑक्टोबर महिन्यात येणारी पालवी नोव्हेंबर संपला तरी आली नाही.

डिसेंबरपासून काजूंना चांगली पालवी आली. अनेक काजू बागांना मोहोरदेखील आला. मात्र त्यानंतर सातत्याने जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची मालिका सुरू झाली. दर चार पाच दिवसांच्या फरकाने जिल्ह्यातील वातावरणात बदल दिसून येत आहे. 

फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. काजूचा मोहोर काळवंडला असून तयार होत असलेला काजू काळा पडू लागला आहे. सातत्याने फवारण्या न परवडणाऱ्या असल्यामुळे या रोगामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात ६७ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड आहे. यातील सुमारे ४९ हजारपेक्षा अधिक क्षेत्र उत्पादनक्षम आहे.


इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...