Agriculture news in Marathi Cashew nuts should be purchased at a guaranteed price of Rs | Agrowon

काजू बी १५० रुपये हमीभावाने खरेदी करावी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 मार्च 2021

काजू बी ला महाराष्ट्र सरकारने १५० रुपये हमीभाव द्यावा आणि ५० रुपये अनुदान तसेच याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा करण्यात यावी

रत्नागिरी ः काजू बी ला महाराष्ट्र सरकारने १५० रुपये हमीभाव द्यावा आणि ५० रुपये अनुदान तसेच याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा करण्यात यावी. त्याचबरोबर गेल्यावर्षी कोरोना परिस्थितीत गोवा सरकारने १०५ रुपये हमी भाव देऊन २० रुपये अनुदान दिले. त्याच धर्तीवर काजू बी शेतीसाठी महाराष्ट्र सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या पंधरा वर्षांत हजारो हेक्टर काजू लागवड झाली आहे. मात्र, काजूचा दर पूर्णपणे उतरला आहे. गेल्या वर्षी कोरोना परिस्थितीमध्ये काजू बीचा दर ६० ते ७० रुपये पर्यंत पडला होता. यावर्षी देखील हीच परिस्थिती भेडसावण्याची भीती आहे. काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काजू प्रक्रिया आणि व्यापारी यांनी भेट घेतली. त्यानंतर काजू प्रक्रियेवरचा व्हॅट १२.५ टक्केवरुन ५ टक्के पर्यंत आला. याचा फायदा व्यापाऱ्यांना फायदा झाला. पण शेतकऱ्याला याचा काहीच फायदा झालेला नाही. एक किलो काजू बी उत्पादन करायला शेतकऱ्याला १२५ रुपये खर्च येतो. तरीही शेतकऱ्याने ६० आणि ७० रुपयाने काजू बी दर परवडणार कसा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील ९० हजार टन काजू बोंड शेतकऱ्यांना अक्षरशः फेकून द्यावे लागतात. काजू बोंड प्रोसेस करण्यासाठी महाराष्ट्र सरकार परवानगी देत नाही. जसे उसाच्या मळीपासून डिस्टिल्ड प्रोसेसिंग करायला परवानगी आहे. द्राक्षाला वाईन करायला परवानगी देत आहेत, तर मग कोकणातील काजू बोंडावरील वाईनला मान्यता मिळाली पाहिजे.

याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आणि शेतकरी मिथिलेश देसाई म्हणाले की, काजूला हमीभाव मिळावा यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे. काजू संबंधित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत व काजू बी ला हमीभाव भेटला नाही तर काजू उत्पादक शेतकरी जन आंदोलन छेडावे लागेल.


इतर ताज्या घडामोडी
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...