agriculture news in Marathi cashew seed procurement started in Sindhudurag Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला सुरुवात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि दोडामार्गच्या माध्यमातून जिल्ह्यात काजू खरेदीला सुरुवात करण्यात आली असून काजूला प्रतिकिलो १४० रुपये दर दिला जात आहे.

सिंधुदुर्गनगरी ः फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि दोडामार्गच्या माध्यमातून जिल्ह्यात काजू खरेदीला सुरुवात करण्यात आली असून काजूला प्रतिकिलो १४० रुपये दर दिला जात आहे. नेतर्डे (ता. सावंतवाडी) येथे गुरुवार (ता. २५) पासून काजू खरेदी सुरू झाली असून पहिल्या दिवशी ४० टन खरेदी करण्यात आला. टप्प्याटप्प्याने दोन्ही तालुक्यात काजू खरेदी करण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांच्या काजू बीला चांगला दर मिळावा या हेतुने गेल्यावर्षीपासून फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि दोडामार्गच्या वतीने काजू खरेदी केली जाते. थेट कारखानदाराने काजू बी खरेदी करावी, यासाठी फळबागायतदार संघ आग्रही आहे. दरम्यान गुरुवारपासून सावंतवाडी येथील नेतर्डे खरेदी केंद्रावर काजू खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली. काजूला प्रतिकिलो १४० रुपये दर सध्या देण्यात येत आहे. 

या खरेदीच्या वेळी संघाचे अध्यक्ष विलास सावंत, विदर्भकोकण ग्रामीण बँकचे व्यवस्थापक कृष्णाजी कोठावळे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, सौरभ सिद्धये, नितीन मावळणकर, विलास गवस, जगदेव गवस, प्रशांत कामत आदी उपस्थित होते. 

दरम्यान काजू बी खरेदी सुरुवात होताच पहिल्या दोन तासातच साडे नऊ टन काजू बी खरेदी झाली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत तब्बल ४० टन काजू बी खरेदी करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी शेतकऱ्यांना थेट कारखानदारापर्यंत घेऊन जाण्याचे काम संघामार्फत केले जात आहे.

एक किलो काजूचे पीक घेण्यासाठी सरासरी खर्च १२२ रुपये येतो. त्याला बाजारात कधी १३० ते १४० रुपये दर मिळतो. त्यामुळे तो शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळवून देण्यासाठी कारखानदारांनी थेट काजू खरेदी करावी, यासाठी संघाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...