agriculture news in marathi, Cashless Scheme in Nashik District is in vain | Agrowon

नाशिक जिल्ह्यात कॅशलेस योजनेचा फज्जा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

नाशिक : नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी शासनाने ‘गाव कॅशलेस’ ही योजना राबविली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २१४ गावे निवडून त्यांची जबाबदारी संबंधित क्षेत्रातील बँकांवरही सोपविण्यात आली. बँकांनीही मोठा गवगवा करून गाव कॅशलेस करण्यासाठी वेगाने काम केले जात असल्याचे भासविले. परंतु, वर्षभरानंतर जिल्ह्यातील एकही गाव १०० टक्के कॅशलेस झाले नसल्याचे समोर आले आहे.

नोटबंदीनंतर मुबलक प्रमाणात रोकड उपलब्ध नसल्याने तसेच भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी शासनाने कॅशलेस व्यवहारांवर भर देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

नाशिक : नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी शासनाने ‘गाव कॅशलेस’ ही योजना राबविली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २१४ गावे निवडून त्यांची जबाबदारी संबंधित क्षेत्रातील बँकांवरही सोपविण्यात आली. बँकांनीही मोठा गवगवा करून गाव कॅशलेस करण्यासाठी वेगाने काम केले जात असल्याचे भासविले. परंतु, वर्षभरानंतर जिल्ह्यातील एकही गाव १०० टक्के कॅशलेस झाले नसल्याचे समोर आले आहे.

नोटबंदीनंतर मुबलक प्रमाणात रोकड उपलब्ध नसल्याने तसेच भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी शासनाने कॅशलेस व्यवहारांवर भर देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

शासनाने भीम अॅपसह अॉनलाइन व्यवहारांसाठी विविध अॅपही आणले. त्यानुसार गाव कॅशलेस करण्यापासून सुरवात करण्यात आली. जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील चापडगावला प्रथम कॅशलेस गाव तयार करण्यासाठी तयारी झाली.
त्यानंतर येथील १०० टक्के व्यवहार कॅशलेस होण्यास सुरवात झाल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले.

चापडगाव हे जिल्ह्यातील पहिले कॅशलेस गाव करण्यात आल्याचा गवगवाही करण्यात आला. प्रत्यक्षात गावात १०० टक्के व्यवहार झालेच नाहीत. अद्यापही गाव कॅशलेस झाले नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर यंत्रणाही ७५ टक्केच व्यवहार आता कॅशलेस झाल्याचे सांगत आहे.

दुसरीकडे जिल्ह्यातून निवडलेल्या २१४ गावांपैकी बहुतांशी गावांत २० ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक व्यवहारही ऑनलाइन पद्धतीने होत नसल्याचे कॅशलेसची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडूनच सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे शहराच्या अगदी लागून तीन हजार लोकसंख्या आणि शिक्षण संस्था, उच्चशिक्षितांचा भरणा असलेले महिरावणी गावही कॅशलेस झाले नाही. गावात किराणा खरेदीपासून ते कुठलेही व्यवहार हे कॅशलेस पद्धतीने होत नसल्याने ग्रामीण भागातील गावांची स्थिती कशी असेल याचा अंदाज यावरून येत आहे.
 
२२ गावांबाबतचा दावाही खोटा
२१४ गावे कॅशलेससाठी निवडून तेथील व्यवहार सहा महिन्यांतच पूर्ण कॅशलेस करायचे होते. २० ते २२ गावे कॅशलेस झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण बँक अधिकाऱ्यांकडून अद्याप गावांची माहिती जमा करण्याचे काम सुरू असल्याने प्रशासनाचा २२ गावे कॅशलेसचा दावाही फोल ठरल्याचेच स्पष्ट झाले.  

बँकांवर जबाबदारी
कॅशलेस गावांसाठी परिसरातील बँकांवर जबाबदारी होती. बँक मित्र गावातील व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी गावकऱ्यांचे, दुकानदारांचे प्रबोधन आणि त्यांना प्रशिक्षित करणार होते. प्रत्यक्षात मात्र योजना सुरू झाल्याच्या महिनाभरात काही अंशी योग्य पद्धतीने काम झाले. नंतर मात्र त्याकडे दुर्लक्षच झाल्याने कॅशलेस गाव योजनेचा फज्जा उडाला.

बँकेकडून अनेक छुपे चार्जेस लावण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांनी कॅशलेसकडे दुर्लक्ष केले. चापडगावला पहिले कॅशलेस गाव म्हणून मान मिळाला. पण आता तो दर ५० टक्क्यांवर आला आहे. गावात इंटरनेटसह इतर बाबींसाठी रेंजची समस्या आहे. अडचणी दूर केल्यास पुन्हा १०० टक्के कॅशलेस व्यवहार होतील. - शांताराम आव्हाड, शेतकरी, चापडगाव.

 


इतर अॅग्रो विशेष
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...