‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७० मिलिमिटर पाऊस

पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी (ता.२२) सकाळपर्यंत अनेक धरणाच्या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला.
In the catchment area of ​​‘Mulshi’ 370 mm of rain
In the catchment area of ​​‘Mulshi’ 370 mm of rain

पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी (ता.२२) सकाळपर्यंत अनेक धरणाच्या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नद्या ओसंडून वाहत होत्या. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७० मि.मी पाऊस झाला. मुळशी धरणात चोवीस तासांत २.५९ टीएमसी पाणीसाठा आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगलाच जोरदार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने पूर्व पट्यातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती भागात कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पूर्व व पश्चिम भागात चांगलाच पाऊस झाला. डिंभे, वडिवळे, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवघर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास १०० मि.मी पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले.

आंबेगावमधील कोलतावडे येथे गावाच्या रस्त्यावर दरड कोसळून मुख्य रस्ता बंद होता. दुपारनंतर तो सुरू करण्यात आला. गाहे, खुर्द, गोहे बु, उगलेवाडी, कोलतावडे, डिंभे खुर्द, बु, कानसे या गावात ओढ्याला पूर आला. त्यामुळे लगतच्या शेतजमिनीच्या बांधांचे नुकसान झाले. भोर तालुक्यातही महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळून रस्त्यावर आल्याने वाहतूक खोळंबली होती. धामणे, वडिवळे, नाणे, कामशेत, पिंपरी, चांदखेड, देवळे मळवस्ती येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आजिवली येथे पुराच्या पाण्याने भात शेतीचे मोठे नुकसान झाले.

कोळचाफेसर व मोरवे खेडमधील आरळा कळमोडी हे धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे आरळी नदीत तीन क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. नायफड येथील मातीचा कच्चा बंधारा फुटला. त्यामुळे आजूबाजूच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले. भिवेगाव, शेंदुर्ली, नायफड, मंदोशी, पाभे, धुवोली, वांजळे, कुडे बु या गावातील भात शेतीला फटका बसला.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ( मि.मी)

पिंपळगाव जोगे २२, माणिकडोह ६३, येडगाव २१, वडज ३३, डिंभे १२९, कळमोडी ९४, चासकमान ६८, भामाआसखेड ५३, वडिवळे १९८, आंध्रा ७९, पवना २३२, कासारसाई ६०, मुळशी ३७०, टेमघर २५०, वरसगाव १५३, पानशेत १५५, खडकवासला ३८, गुंजवणी ११५, नीरा देवघर २४९, भाटघर ३२, वीर ९, नाझरे ७, उजनी ७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com