agriculture news in marathi In the catchment area of ​​‘Mulshi’ 370 mm of rain | Page 3 ||| Agrowon

‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७० मिलिमिटर पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 जुलै 2021

पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी (ता.२२) सकाळपर्यंत अनेक धरणाच्या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला.

पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी (ता.२२) सकाळपर्यंत अनेक धरणाच्या परिसरात पावसाचा जोर अधिक होता. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नद्या ओसंडून वाहत होत्या. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७० मि.मी पाऊस झाला. मुळशी धरणात चोवीस तासांत २.५९ टीएमसी पाणीसाठा आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगलाच जोरदार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने पूर्व पट्यातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती भागात कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. पूर्व व पश्चिम भागात चांगलाच पाऊस झाला. डिंभे, वडिवळे, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवघर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास १०० मि.मी पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले.

आंबेगावमधील कोलतावडे येथे गावाच्या रस्त्यावर दरड कोसळून मुख्य रस्ता बंद होता. दुपारनंतर तो सुरू करण्यात आला. गाहे, खुर्द, गोहे बु, उगलेवाडी, कोलतावडे, डिंभे खुर्द, बु, कानसे या गावात ओढ्याला पूर आला. त्यामुळे लगतच्या शेतजमिनीच्या बांधांचे नुकसान झाले. भोर तालुक्यातही महाड मार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळून रस्त्यावर आल्याने वाहतूक खोळंबली होती. धामणे, वडिवळे, नाणे, कामशेत, पिंपरी, चांदखेड, देवळे मळवस्ती येथील पुलावरून
पाणी जात असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आजिवली येथे पुराच्या पाण्याने भात शेतीचे मोठे नुकसान झाले.

कोळचाफेसर व मोरवे खेडमधील आरळा कळमोडी हे धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे आरळी नदीत तीन क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. नायफड येथील मातीचा कच्चा बंधारा फुटला. त्यामुळे आजूबाजूच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले. भिवेगाव, शेंदुर्ली, नायफड, मंदोशी, पाभे, धुवोली, वांजळे, कुडे बु या गावातील भात शेतीला फटका बसला.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ( मि.मी)

पिंपळगाव जोगे २२, माणिकडोह ६३, येडगाव २१, वडज ३३, डिंभे १२९, कळमोडी ९४, चासकमान ६८, भामाआसखेड ५३, वडिवळे १९८, आंध्रा ७९, पवना २३२, कासारसाई ६०, मुळशी ३७०, टेमघर २५०, वरसगाव १५३, पानशेत १५५, खडकवासला ३८, गुंजवणी ११५, नीरा देवघर २४९, भाटघर ३२, वीर ९, नाझरे ७, उजनी ७


इतर अॅग्रो विशेष
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...
फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावधनागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या...