पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढला 

गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे.
  पुण्यातील धरणांच्या पाणलोटात  पावसाचा जोर वाढला    In the catchment area of dams in Pune The rain intensified
  पुण्यातील धरणांच्या पाणलोटात  पावसाचा जोर वाढला    In the catchment area of dams in Pune The rain intensified

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. या पावसामुळे मुठा, पवना, भीमा, भामा, नीरा, घोड, कुकडी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.  राज्यात चार ते पाच दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यातही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. काही वेळा ऊन पडत असले तरी पावसाच्या प्रभाव वाढला आहे. पूर्व भागातील दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, पुरंदर तालुक्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्यात पावसाचा अनेक ठिकाणी जोर वाढला आहे. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असून, भात खाचरे भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरत आल्याने आगामी काळातील पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता आहे.  वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५ मिलिमीटर, वरसगाव, पानशेत १३, पवना २६,कळमोडी २२, आंध्रा १३, भाटघर १६, पिंपळगावा जोगे २०, माणिकडोह १८, येडगाव १५, चिल्हेवाडी १०, उजनी १२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर खडकवासला, कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, नाझरे, गुंजवणी, नीरा देवघर, वीर, वडज, डिंभे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्या आहेत. सध्या भात पिकांना पाऊस पोषक ठरत आहे. त्यामुळे भात पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत आहेत. तर बाजरी, मूग, उडीद पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी काढणी सुरू असल्याने हा पाऊस काढणीच्या पिकांना नुकसानकारक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नुकसान होण्याची चिंता वाढली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com