Agriculture News in Marathi In the catchment area of dams in Pune The rain intensified | Agrowon

पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढला 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे.

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. या पावसामुळे मुठा, पवना, भीमा, भामा, नीरा, घोड, कुकडी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

राज्यात चार ते पाच दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यातही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. काही वेळा ऊन पडत असले तरी पावसाच्या प्रभाव वाढला आहे. पूर्व भागातील दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, पुरंदर तालुक्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.

पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्यात पावसाचा अनेक ठिकाणी जोर वाढला आहे. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असून, भात खाचरे भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरत आल्याने आगामी काळातील पाणीटंचाई कमी होण्याची शक्यता आहे. 

वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २५ मिलिमीटर, वरसगाव, पानशेत १३, पवना २६,कळमोडी २२, आंध्रा १३, भाटघर १६, पिंपळगावा जोगे २०, माणिकडोह १८, येडगाव १५, चिल्हेवाडी १०, उजनी १२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर खडकवासला, कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, नाझरे, गुंजवणी, नीरा देवघर, वीर, वडज, डिंभे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्या आहेत.

सध्या भात पिकांना पाऊस पोषक ठरत आहे. त्यामुळे भात पिके वाढीच्या व निसवण्याच्या अवस्थेत आहेत. तर बाजरी, मूग, उडीद पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी काढणी सुरू असल्याने हा पाऊस काढणीच्या पिकांना नुकसानकारक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नुकसान होण्याची चिंता वाढली आहे.  


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...